शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर २०२२
'सायबर क्राईम' या विषयावर श्री शाहू विद्यामंदिर खडांबे येथे गणेश उत्सवाच्या निमित्ताने पी. आय.प्रताप दराडे यांचे विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन..!!
पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे साहेब यांचं शाहू विद्यालयातील विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन..!!
राहुरी,(खडांबे) : श्री शाहू विद्यामंदिर खडांबे येथे गणेश उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयाची व्याख्याने आयोजित केली जातात यावर्षी राहुरी तालुका पोलीस स्टेशनचे पी. आय. श्री. प्रताप दराडे साहेब यांचं सायबर क्राईम या विषयावर व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलं होतं.
या व्याख्यानामध्ये दराडे साहेबांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि त्याचा गैरवापर सायबर क्राईम आणि त्याचे परिणाम विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कसा करावा या विषयावर मौलिक स्वरूपात मार्गदर्शन केलं.
कार्यक्रम सूरू असताना उपस्थीत विद्यार्थी अतिशय भारावून जाऊन हा सर्व बाबी मनलाऊन ऐकत होते. यावेळी पोलीस श्री साखरे साहेब उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमाने सर हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नेते श्री.आप्पासाहेब शिंदे सर यांनी केलं तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रोकडे सर यांनी केलं आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. राहुल जाधव सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक श्री. कुसमुडे सर, श्री, म्हसे सर,साठे सर, बंगर सर, कारले सर, कुऱ्हे सर, दुशिंग सर,साबळे सर, कुर्हे सर, पर्यवेक्षक नरवडे सर, रामफळे सर,चौधरी मॅडम, आसल मॅडम, म्हस्के मॅडम, कल्हापुरे मॅडम, डंबरे मॅडम, थोरात जी. आर. आदि शिक्षक बंधू भगिनींनी कार्यक्रम यशस्वी साठी खूप परिश्रम घेतले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

