आडसूळमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : ६ / नगर तालुक्यातील चास येथील साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या आडसूळ तंत्रनिकेतन आणि आडसूळ इंजिनिअरिंग मध्ये डॉ. सर्वपल्ली राधकृष्णन् जयंतीनिमित्त शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी विविध वैचारिक व प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करून विविध क्षेत्रातील शिक्षकांना अभिवादन करण्यात आले . या सोहळ्याच्या आनंदात भर घालण्यासाठी आणि हा उत्सव सर्वांसाठी खऱ्या अर्थाने अविस्मरणीय बनवण्यासाठी आडसूळ पॉलिटेक्निकचे विदयार्थी तन्मय सोनवणे, सुमित्रा देवकर, वैष्णवी नलगे इत्यादींनी आपल्या भाषणातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
प्राध्यापक जगधने एम. के. यांनी विद्यार्थ्यांना निरीक्षण क्षमता आणि जिज्ञासा कायमस्वरूपी जागृत ठेवण्याचा संदेश दिला. इंजिनिअरिंगचे उपप्राचार्य जाधव के. पी. यांनी आडसूळ तंत्रनिकेतन बद्दल गौरव उद्गार काढत ही संस्था कौशल्याधिष्ठित व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास यशस्वी ठरली आहे असे प्रतिपादन केले. तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्राध्यापक गडाख आर. एस. यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना अध्ययन, अध्यापन आणि उपयोजन या शिक्षण प्रणालीच्या संकल्पनेवरती मार्गदर्शन केले. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ आडसूळ यांनी शिक्षकांनी विषयाचं सखोल ज्ञान घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा संदेश दिला.
संस्थेचे अध्यक्ष मा .श्री . अनिरुद्धजी आडसूळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्त्व असून शिक्षकांनी आपल्या ज्ञानवर्धना बरोबरच स्वतःचे आरोग्य ही सांभाळले पाहिजे त्यासाठी नियमित व्यायाम करावा हा संदेश आपल्या भाषणातून दिला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री अनिरुध्द आडसूळ, संस्थेच्या सेक्रेटरी सौ. लीनाताई आडसूळ, उपाध्यक्ष मा श्री विश्वनाथ आडसूळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य गडाख आर एस इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. पी. एम.पाटील, इंजीनियरिंगचे उपप्राचार्य जाधव के पी, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन कॉलेजचे प्रसिद्धी प्रमुख प्रो.श्री . सुहास पाखरे सर यांनी केले . सूत्रसंचालन स्थापत्य विभागप्रमुख प्रा. आकांक्षा म्हस्के आणि आभारप्रदर्शन विद्यार्थिनी सुप्रिया गर्जे यांनी केले.

