शिव फाउंडेशनच्या वतीने डिकसळ येथे प्लास्टिक संकलन जाळी बसविण्यात आली.
इंदापूर -भिगवण : भिगवण व परिसरामध्ये शिव फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यात सामाजिक हेतूतून ग्रामपंचायत डिकसळ येथे डिकसळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने प्लास्टिक कचरा संकलन जाळी बसवण्यात आली. याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्या दररोजच्या वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक बॉटल आपण इतरत्र फेकून देऊन परिसर अस्वच्छ करतो . तर ते न करता या प्लास्टिक कचरा संकलन जाळीमध्ये टाकून कचऱ्यापासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसण्याठी या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक हेतूने व ग्रामपंचायतच्या मागणीनुसार प्लास्टिक कचरा संकलन जाळी बसवण्यात आली.
शिव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर यांनी येणाऱ्या काळात देखील आपल्या डिकसळ या ठिकाणी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. डिकसळ ग्रामपंचायतचे सरपंच सवाने यांनी बसवण्यात येत असलेल्या प्लास्टिक कचरा संकलन जाळी बाबत समाधान व्यक्त केले आहे. व शिव फाउंडेशनला सामाजिक उपक्रमांसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. डिकसळ गावचे ग्रामसेवक परदेशी यांनी सदर मागणी संजय खाडे यांच्याकडे करण्यात आली होती. मागणीला तत्परतेने घेऊन सदर उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी फाउंडेशनच्या अध्यक्ष संपत बंडगर, रोटरी क्लब ऑफ भिगवन चे मा.अध्यक्ष संजय खाडे, उपाध्यक्ष स्वच्छ भारत अभियान दिनेश मारणे, आकाश वनवे तसेच डिकसळ गावचे सरपंच सूर्यकांत सवाणे, उपसरपंच लता काळे, भाऊसाहेब परदेशी,उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका सुनील काळे, आजिनाथ गायकवाड, धनंजय पवार, मारुती शिंदे ललिता पोंकुले सुनिता गवळी, रावसाहेब गवळी सतीश काळे जिजाराम पोंदकुले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

