shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देव आणि देवावरचा विश्वास...

परमेश्वरी शक्ती हे अंतिम सत्य आहे हे जगातला प्रत्येक देश मानतो. त्यानुसार त्या देशाचे संविधान ठरत असते. फक्त आपला भारत देश असा आहे या देशातील जनता परमेश्वरावर विश्वास ठेवायला तयार नाही. क्षणोक्षणी जे ईश्वरी तत्व आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक देते ते ईश्वरी तत्त्व अस्तित्वातच नाही. करता सवरता मीच आहे अशा भ्रमात अभिमान/अहंकार  जोपासत आपण चालतो तेव्हा समर्थ म्हणतात त्याप्रमाणे "अभिमाने उठे मत्सर,मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे।" या उक्तीनुसार  अहंकार, द्वेष, मत्सर हे शरीरामध्ये वास्तव्य करू लागतात व माणसाचे संतुलन बिघडते.  त्याला विविध विकार/ आजार जडतात. 

हे विकार विश्वाच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहेत.
 आपण स्वतःच्या मर्जीने काहीही करू शकत नाही. सूर्य उगवला नाही तर काय होईल याचे चिंतन आपण करायला तयार नाही. वेळेपूर्वी काहीच मिळत नाही आणि नशिबात असेल तेवढेच आपल्याला मिळते हे सांगणारे असंख्य दाखले समोर असले तरी आम्ही एवढे अहंकार आहोत की आम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही. हा अविश्वासच आज सर्व संकटांचा कारक ठरलेला आहे. जो परमेश्वर आपल्याला सर्व काही देत आहे/देणारा आहे त्याच्यावरच अविश्वास दाखवायचा. त्याचं अस्तित्वच नाकारायचं ही खोड अलीकडे अनेकांना जडलेली आहे. असे मूठभर लोक करत असलेल्या या घातकी व समाज विघातक कृतीतून अखिल विश्वाचे संतुलन बिघडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परमेश्वर, निसर्ग, शाश्वत आचार/ विचार यांना आव्हान देणारी अघोरी शक्ती ही कलियुगाचा अंत करण्यासाठी कार्यरत होणार ही देखील ईश्वराची रचना समजायची. हे शाश्वत सत्य असले तरी स्वतःच्या समाधानासाठी, आनंदासाठी  परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका.

लेखक : 
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने.
मो. ९८८१३७३५८५
close