shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री.काशिनाथ गोराणे यांना विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा सेवाभावी व्यक्तिमत्व पुरस्कार घोषित..!


शौकतभाई शेख श्रीरामपूर :
 येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा पहिला कै. नामदेवराव विश्वनाथ सुकळे सेवाभावी व्यक्तिमत्व पुरस्कार घोषित करण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी दिली. 

   विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान ही मान्यताप्राप्त सेवाभावी संस्था असून ती ३० जानेवारी २०१८ रोजी महात्मा गांधी पुण्यतिथीदिनी सुरु झाली. महात्मा गांधी यांचा आदर्श समोर ठेवून विविध सेवाभावी कार्य करीत आहे.कै. नामदेवराव सुकळे हे चंद्रपूर जिल्ह्यातून सन १९६० साली श्रीरामपूर येथे आले. त्यांनी अशोक सहकारी साखर कारखाना येथे प्रामाणिकपणे सेवा केली.ते विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष होते.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे, कार्याध्यक्ष माजी प्राचार्य  टी. ई. शेळके, समनव्यक प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये,सदस्य सुदामराव औताडे, खजिनदार पुष्पाताई सुकळे आदिंच्या सहकार्याने कै. नामदेवराव सुकळे यांनी सामाजिक सेवाकार्यात मोठे योगदान केले, अशा सेवाभावी व्यक्तिमत्वाच्या नावाने श्री. काशिनाथ गोराणे यांना प्रतिष्ठानचा 'सेवाभावी व्यक्तिमत्व पुरस्कार 'घोषित झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कै. नामदेवराव सुकळे यांच्या प्रथम पुण्यतिथीदिनी सोमवार दि.१२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३०  शिरसगांव येथील रेल्वे  ओहर ब्रीजजवळ, माऊली वृद्धाश्रमात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
close