shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वांबोरी येथील बाळगोपाळानीं घरगुती गणपती बाप्पाची आरस केली आगळी-वेगळी आणि अनेकांना भुरळ घालनारी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०८ सप्टेंबर २०२२ 

वांबोरी येथील बाळगोपाळानीं घरगुती गणपती बाप्पाची आरस केली आगळी-वेगळी आणि अनेकांना भुरळ घालनारी..!!
वांबोरी : लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणाला गणपती बाप्पाची आरस करायला आवडत नाही या प्रमानेच  राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर नजीक असलेली पटारे-पागिरे  वस्तीवरील तीन बाळगोपाळानीं मिळून गणपती बाप्पाची घरगुती आरस अतिशय सुंदर, सुरेख, डोळ्यांचे पारणे फेडणारी, मनमोहक आणि पाहणाऱ्यांना भुरळ घालनारी आहे.

      कु. सिद्धी राजेंद्र पागिरे, वेदिका राजेंद्र पागिरे, कौस्तुभ विलास पागिरे हे तीनही विद्यार्थी डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय वांबोरी येथे शिक्षण घेत आहेत. यांनी त्याचे दैनंदिन कामकाज आणि शाळेतील आभ्यासक्रम सूरू ठेवत गणपतीबाप्पाची आरस जी अशी घरगुती कोणीच केलेलीं नसेल अशी आरस केली.
  त्यांचा इतरांपेक्षा काहितरी वेगळा करण्याचा मानस होताच याचं प्रयत्नातून ही आरास साकरण्याची आपली इच्छा त्यांनी या माध्यमातून पूर्ण केलेली आहे.
       दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या बाळगोपाळाच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले परंतु त्याआधी पंधरा दिवस त्यांनी गणेश उत्सवाची तयारी सुरू केली होती त्यांनी यावर्षी इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्नही केला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला, चार धामा पैकी एक अतिशय रम्य असे महादेवाचे मंदिर-केदारनाथ,आणि गणपती बाप्पांच्या साठी छोटीशी आणि निसर्गरम्य अशी झोपडी तयार केलेली आहे.
       ही नयनरम्य आरस तयार करण्यासाठी त्यांनी उपयोगात नसलेल्या वस्तू तसेच निसर्गातील अनेक घटकांचा आधार घेतला त्यासाठी त्यांनी झाडांचे वाळलेली फांदी, झोपडीसाठी उसाचे पाचट यासारख्या निरोपयोगी साहित्यांचा जास्तीत जास्त वापर केला तसेच उर्वरील खर्च आपल्या खाऊच्यां पैशांमधून डेकोरेशनचा खर्चही भगवीला गणपती बाप्पांच्या आगमनाच्या तयारी करताना त्यांनी 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' या म्हणी प्रमाणेच प्रमाणिक आणि मनापासून प्रयत्न केला तर त्यांना त्यात पूर्णतः सुयश मिळाले असेही म्हणता येईल.
वांबोरी येथील बाळगोपाळानीं घरगुती गणपती बाप्पाची आरस केली आगळी-वेगळी..!!

          म्हणतात ना की "देवाला कशाचाही मोह नसतो" याच संकल्पनेतून त्यांनी बाप्पांसाठी ऋषीमुनी सारखी झाडाच्या सावलीखाली झोपडी तयार केली. ज्यांना केदारनाथ सारख्या ठिकाणी जायचे आहे अशी खूप जणांची इच्छा असते परंतु दररोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना आपआपले काम आणि कर्तव्य यातून सुटका भेटत नसते प्रत्येक जण तर तिथे जाऊ शकत नाही मग का नको आपण घरीच केदारनाथसारखे दृश्य निर्माण करायला म्हणजे यातून आपणही तिथे गेल्याचा अनुभव आपल्याला घेता येईल आणि इतरांनाही हा अनुभव अनुभवीता येईल. या कल्पनेने त्यांनी केदारनाथाचे छोटेसे मंदिर तयार करण्याचाही प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वीही झाला. गणपती गणपतीच्या दिवसात या बाळगोपाळाच्या घरी जणू काही दिवाळी असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
       त्यांचे म्हणणे असे आहे की आमच्या आदर्श शिवाजी महाराज असल्याने त्यांचा किल्ला तसेच जगाचा पोशिंदा शेतकरी दादा, बुद्धीची देवता आणि सर्वकार्येषु सर्वदा म्हणतांना सर्वात आधी गणेशाची पूजा होत असते, प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेशाला वंदन करूनच होत असते म्हणून गणपती, आणि शक्तीची देवता भोलेनाथ यांना नमस्कार करण्याचा योग यावेळी आम्हाला आला.
      यापूर्वी आपण गणपती पाहण्यासाठी लोक पुणे मुंबई आणि कोकणात तसेच इतर शहरातही जाणारे लोक आहेत हे माहिती होते पण वांबोरी येथील पटारे-पागिरे या छोट्याशा वस्तीवर गावातून, बाहेरच्यागावातून, मित्रपरिवार, शिक्षक, शिक्षिका, सगे-सागे आणि आत्पेष्ट ही आरस येऊन पाहून आणि वाह-वाह करून गेल्याने या बळगोपाळाचा आनंद तर आता गगनात मावेनासा झाला.

    मागील वर्षी पोलीस मित्र संघटना तर्फे अहमदनगर जिल्ह्यातून या बळगोपाळाना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ही मिळालेले होते. हा सर्व देखावा तयार करण्याकरिता त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपैकी त्यांच्या आज्जी बाईंची ही मदत मिळाली. तसेच हा देखावा पाहण्यासाठी आलेल्यां प्रत्येकांनी तर या बळगोपाळाच्या बुद्धिमत्तेची आणि कल्पनाशक्तीचे सर्वत्र तोंडभरून  कौतुकही होत आहे.
    
        हा देखावा बघण्यासाठी पटारे-पगिरे वस्ती वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेच्या आदर्श शिक्षिका नवले मॅडम,शेख मॅडम,प्रसिद्ध कांदा व्यापारी निलेश शेठ पारख आणि त्यांच्या सौभाग्यवती शितलताई, सचिन हरिश्चंद्रे सर, आर. टी. ओ. ऑफिसर अमृता पटारे, राहुल पटारे (बँक ऑफ इंडिया), माजी प्राचार्य महामीने सर,विनायक कासार (ग्राहक मंच), शिवकन्या दूध चेअरमन मयूर पागिरे, संदीप ढोकणे (विघ्नहर्ता मेडिकल), सोमानाथ हरिश्चंद्रे तसेच अनेक पाहूणे मंडळी यांनी या ठिकाणी भेटी दिल्यानंतर या बाळगोपलांच्या देखाव्याचा स्तुत्य उपक्रम पाहून सगळे आवक् झाले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600  
close