शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०२२
कृषीसंजीवनी : खताची ग्रेड आणि त्यांचे पिकांमधील कार्य..!!
श्री. सतीश सोनवणे
(बीएस्सी कृषी एमबीए)
९५४५०२०३४३
यू ट्यूब चॅनेल नाव: कृषिमित्र.
यू ट्यूब लिंक: https://youtube.com/channel/UCeI8yZJzjRt--gmGuHloGew
A) १३:००:४५-
१. यास पोटॅशिअम नायट्रेट असे म्हणतात.
२. यात विद्राव्य स्वरूपातील नत्राचे प्रमाण कमी असून पालाशचे प्रमाण अधिक असते.
३. या खताची खरी गरज पिकास फुलोरा अवस्था तसेच पकव्यतेच्या अवस्थेत असते.
४. या ग्रेड चे मुख्य कार्य अन्नवहन आणि अन्ननिर्मिती करणे हे आहे.
५. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या ग्रेडचा उपयोग होतो.
B) ००:००:५० –
१. यास पोटॅशिअम सल्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश असे म्हणतात.
२. या ग्रेड मुळे रंग, आकार, वजन, तसेच गुणवत्ता आणि टिकाऊपणा यासाठी मदत होते.
३. या ग्रेड मध्ये सल्फेट स्वरूपातील गंधक असल्याने भुरी सारख्या रोगावर नियंत्रण मिळवता येते.
C) १२:३२:६१-
१. कायीक वाढ थांबवून फुलधारणा चांगली होण्यासाठी , फुलकळी जास्त येण्यासाठी तसेच फळधारणा चांगली येण्यासाठी या ग्रेडचा उपयोग होतो.
D) २४:२४:००:०८-
१. या खतातील नत्र हे अमोनिकल आणि नायट्रेट स्वरूपात उपलब्ध होते.
२. शाकीय वाढ तसेच फुलधारणा अवस्थेत याचा वापर करता येतो.
E) ००:५२:३४-
१.मोनो पोटॅशिअम फॉसफेट असे म्हणतात.
२. फुल लागण्यापूर्वी किंवा लागल्यानंतर या ग्रेडचा वापर केला जातो.
३. योग्य वाढ आणि रंग यासाठी मदत होते.
F) १२:६१:००-
१.या खतास मोनो अमोनिअम फॉसफेट असे म्हणतात.
२. नवीन मुळांची तसेच शाकीय वाढ जोमदार होण्यासाठी हे ग्रेड उपयुक्त असतात.
३. फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खताचा वापर होतो. तसेच चांगला फुटवा येण्यासाठी मदत होते.
G) १३:०:१३-
१. पाते फुल लागण्याच्या वेळेस जर या ग्रेडची फवारणी केली तर थांबविण्यासाठी मदत होते.
२. याशिवाय शेंगवर्गीय पिकात शेंगाची संख्या वाढविण्यासाठी मदत होते.
H) १९:१९:१९ आणि २०:२०:२० –
१. या खतांना स्टार्टर ग्रेड असे म्हणतात.
२. या खताचा वापर मुख्यते करून पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी केला जातो.
I) कॅल्शिअम नायट्रेट –
१. या खताचा वापरामुळे पिकाच्या मुळ्या जोमदार वाढून पीक काटक बनते.
२.मुळांच्या वाढीसाठी या खताची आळवणी केल्यास उत्तम परिणाम दिसून येतात.
३.पीक वाढीच्या सुरवातीच्या काळात तसेच शेंगा किंवा फळ वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर केला जातो.
श्री. सतीश सोनवणे
(बीएस्सी कृषी एमबीए)
९५४५०२०३४३
यू ट्यूब चॅनेल नाव: कृषिमित्र.
यू ट्यूब लिंक: https://youtube.com/channel/UCeI8yZJzjRt--gmGuHloGew
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

