चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने
जागर महापुरुषांच्या विचारांचा
शौकतभाई शेख, श्रीरामपूर :-
चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूर आयोजित "जागर महापुरुषांच्या विचारांचा हा उपक्रम सलग दहा दिवस राबविण्यात येत आहे, यामध्ये थोर राष्ट्र संत,महापुरुष, महामानव, समाजसुधारक यांच्या जिवन चरित्र आणि विचारांची माहीती देण्याचे कार्य या उपक्रमातून करण्यात येत आहे.
दिनांक ३१ /०८/ २०२२ ते ०९/०९/२०२२ असे दहा दिवस रोज सायंकाळी ६ ते ७ वाजे दरम्याने,ज्यांनी देश आणी सामाजासाठी मोठे योगदान दिले त्या रियल हिरोज राष्ट्र संत, महामानव,थोर समाजसुधारक यांच्या जिवन चारित्र्यावर अधारीत माहितीद्वारे प्रबोधनात्मक कार्यक्रम हा उपक्रम काळाची गरज ठरत आहे.
समिती पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर तहसील कार्यालयाचे तहसिलदार श्री.प्रशांत पाटील यांची उपस्थिती लाभली असता,त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात "जागर महापुरुषांच्या विचारांचा" हा उपक्रम मी राज्यात प्रथमच बघतो आहे, असा हा अत्यंत उपयुक्त आणि स्तूत्य उपक्रम चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) यांचे कडून राबविण्यात येत असल्याने आज चर्मकार संघर्ष समिती ने राज्यात इतिहास घडवला असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आज समाजाला महापुरुषांच्या विचारधारेची गरज आहे.प्रत्येक समाजातील बंधू - भगीनींनी असे सामाजाभिमुख उपक्रम आपापल्या घरोघरी देखील साजरे करावेत,महापुरुषांनी केलेल्या कार्याचा सर्व समाजाने आपल्या जीवनात, समाजासाठी उपयोग होईल यासाठी प्रयत्न करावेत. समाज उत्तम शिक्षणाने घडत असतो, म्हणून शिक्षण खूप महत्त्वाचे आहे, शिक्षणाकडे कोणीही दुर्लक्ष करू नये, सामाजिक सलोखा, एकता, निर्भयता, तसेच एकमेकांना सहकार्य या सर्व गोष्टी या महापुरुषांनी आपल्याला शिकवलेल्या आहेत, त्यांचे हे अनमोल विचार आपण आपल्या जीवनात कधीही विसरून चालणार नाही,सामाजात सामाजिक,जातीय सलोखा अबाधित राहुल शांतता कशी प्रस्थापित करता येईल याकडे सर्वांचे कटाक्षाने लक्ष असावे.
शिक्षणासोबत आपसात सामाजिक,जातीय सलोखा आणी बंधूभाव निर्माण झाल्यास सर्वच समाज प्रगत होतो,हेच आपल्याला सर्व महापुरुषांनी सांगितले आहे,आज विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे, आपल्या महापुरुषांनी सर्व समाजासाठी कार्य केलेले आहे,हे विसरुन चालणार नाही,कारण त्यांच्या त्यागामुळे आपल्या सर्व पिढ्या या सुखी, समाधानी,आणि आनंदी झालेल्या आहेत, सदरील कार्यक्रमाचा विषय आणि आयोजन बघून आपण भारावून गेलो असल्याचेही श्री.पाटील म्हणाले.त्यांनी या उपक्रमाची स्तुती करत म्हणाले की,मी महाराष्ट्रात आतापर्यंत असा अनमोल,अभिनंदनीय,आणि सर्वसमावेशक असा स्तूत्य उपक्रम कधीच पाहिलेला नाही,मात्र पहील्यांदाच एक आदर्श उपक्रम बघत असताना मनस्वी आनंद होत आहे,तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणावर भर दिल्यास जिवनातील अंधकार दुर होतो असेही ते म्हणाले.तथा चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) यांनी अशा या स्तूतीजन्य उपक्रमाद्वारे कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल धन्यवादही दिले.
चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूर यांच्या विद्यमाने संस्थेचे जिल्हा संघटक, दिलीपराव शेंडे (सर) यांच्या कांदा मार्केट जवळील कौशल्यानगर स्थित त्यांच्या निवासस्थानी, "महापुरुषांच्या विचारधारेच्या जागर" हा उपक्रम सलग दहा दिवस राबविण्यात येत आहे.
समाजाला, विद्यार्थ्यांना, महापुरुषांचे विचार, त्यांचे कार्य समजावे म्हणून दहा दिवस महापुरुषांच्या विचारधारेवर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे व्याख्याने आयोजित केलेली आहेत, सध्याच्या धगधगीच्या युगामध्ये समाजामध्ये दुरी निर्माण होत आहे, समाजाचे विचार अंधश्रद्धेकडे वाढत चाललेले आहेत,महापुरुषांची विचारधारा लोप पावत चालली आहे, या सर्व महापुरुषांनी सर्वच समाजासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. महापुरुषांनी समाजासाठी खूप काही कार्य केलेले आहे,अनेक अडचणी,संकटे यांचा सामना करत समाजाला चांगले विचार दिलेले आहे. परंतु आज समाज हे सर्व विसरत चालला आहे. समाज महापुरुषांच्या विचारधारे ऐवजी नको त्या गोष्टीत गुंतत चाललेला आहे,म्हणूनच चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे सर्व महापुरुषांच्या कार्याची माहिती आणि महती समाजाला व्हावी याकरिता अहमदनगर जिल्हा संघटक दिलीपराव शेंडे (सर), उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय दळवी,महिला जिल्हाध्यक्षा सुनंदा शेंडे, शहराध्यक्षा इंदुताई नन्नवरे, शहराध्यक्ष कर्णासाहेब कापसे, जिल्हा उपाध्यक्षा सोनल वाघमारे, प्रेमचंद वाघमारे,नामदेव कानडे, अशोक खैरे (सर), सर्व पदाधिकारी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.
यावेळी शिवाजीराव गांगुर्डे,रमेश मकासरे (सर) थोरात (सर), सतीश जाधव (सर) यांनी आपले मनोगत व्यक्त केले .महापुरुषांचे विचार जागर कार्यक्रमास नायब तहसीलदार अमोल एडके, नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे, माजी सैनिक मेजर कृष्णा सरदार, गटशिक्षणाधिकारी श्री. बोरुडे, श्री.आढाव,श्री.मकासरे सर, सर्व बामसेफ पदाधिकारी, थोरात सर, देवरे सर, सतीश जाधव सर सर्व परिवर्तन शिक्षक पदाधिकारी,एकलव्य भिल्ल समाज संघटना प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे साहेब, सोमनाथ गांगड साहेब, समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटचे इंजि.मोहसीन शौकत शेख, सामाजिक कार्यकर्ते दिलीप अभंग,श्री.देवराय, बाळासाहेब चव्हाण,आशाताई दळवी, श्री.सोनवणे,बर्डे मॅडम, मनिषा पोटे, मोहिनी खैरे,पंडूरे मॅडम, शाम रणपिसे सर, कुमार कानडे सर,शेटे साहेब, तसेच चर्मकार संघर्ष समिती श्रीरामपूर सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रेमचंद वाघमारे, सर्वश्री अशोक खैरे सर ,चव्हाण काका, नामदेव कानडे, देवराय , क्षिरसागर, नन्नवरे, पोटे काका यांनी उत्तमरीत्या केले होते. शेवटी सर्व मान्यवरांचे आभार दिलीप शेंडे सर यांनी मांनले.

