shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गटविकास अधिकारी कोपरगाव पंचायत समिती यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांचेच दालना समोर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे याचे आज दि.३० रोजी बैठा सत्याग्रह...!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
कोपरगाव । प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील मौजे संवत्सर येथील ग्रामपंचायत मालकीचे क्षेत्र ३.९४ हे आर जमीन ही बेकायदेशीर शासनाची परवानगी न घेता 'शृंगेश्वर महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी' ला अनधिकृतपणे हस्तांतरीत करण्यात आली आहे..

संजय भास्करराव काळे

सदरच्या राज्य महामार्ग लगत असलेल्या कोट्यावधी च्या मालमत्तेचे माहिती अधिकारात प्राप्त कागदपत्र पुरावे सादर करुन गटविकास अधिकारी यांना चौकशी ची मागणी केली आहे.
संजय काळे यांच्या तक्रारी नुसार काय कारवाई केली ह्या संदर्भातील विषय घेऊन त्यांनी माहिती अधिकार अर्ज टाकला, महिना उलटून गेल्या नंतर माहिती अधिकाराचे अपिल दाखल केले.. त्यानंतर देखील कालावधी उलटून गेली तरी अपिलावर सुनावणी झालीच नाही.

ह्याच विषया संदर्भात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन ने देखील  गटविकास अधिकारी यांना अहवाल मागितला.. परंतू पोलिसांना देखील अहवाल दिला नाही.. ह्या संवत्सर गावचे जमीन गैरव्यवहारात गटविकास अधिकारी यांचे देखील सहभाग असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून संजय काळे हे आज शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता ते एक वाजेपर्यंत गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगाव यांचे दालनाचे बाहेर काळा झेंडा घेऊन उभा राहून शांततापूर्ण मार्गाने एकटाच सत्याग्रह करणार असल्याचे संजय काळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
close