*दहावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा*.
*:- श्रीमती माधवी देसाई*
( *आश्रमशाळेत दहावीच्या वर्गाला विविध पुस्तकांचे संच वाटप*) .
*इंदापूर प्रतिनिधी(दि.२८) :-आश्रमशाळेतील दहावीच्या गरीब, गरजवंत,कष्टाळू व होतकरू मुला- मुलींना शिक्षणासाठी थोडेफार का होईना फाउंडेशनच्या वतीने सहकार्य व्हावे, हाच प्रामाणिक हेतू असल्याचे पुस्तक संच वाटपानंतर श्रीमती माधवी देसाई यांनी भावना व्यक्त केल्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अनंतराव देसाई एज्युकेशन फाउंडेशन इंदापूरच्या वतीने ५० मुला-मुलींना क्रमिक पुस्तके, नवनीत, अपेक्षित, आलेख वही, प्रकल्प वही आदी पुस्तकांच्या संचांचे वाटप करण्यात आले.त्यावेळी फाउंडेशनच्या संचालक श्रीमती माधवी देसाई बोलत होत्या .
भिमाईचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी प्रास्ताविक केले.
श्रीमती देसाई यांचा आश्रमशाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्या अनिता साळवे, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले,तर आभार राजेंद्र हाळनोर यांनी मानले.

