shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथील श्रीनाथ विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरातील कडू लिंबाच्या झाडांची शेंड्यांची व फांद्यांची अज्ञातांनी केली छाटणी.

वडापुरी येथील श्रीनाथ विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरातील कडू लिंबाच्या झाडांची शेंड्यांची व फांद्यांची अज्ञातांनी केली छाटणी.

विद्यार्थ्यांच्या सावलीसाठी मोठी झालेली पाच सहा झाडांची दुरवस्था करणारे कृत्य अयोग्य जनमानसामध्ये चर्चा.  
इंदापूर प्रतिनिधी:वडापुरी येथील श्रीनाथ विद्यालय व जि.प्र. प्रा.शाळा याच्या पाठीमागील परिसरात कडूलिंबाची पाच सहा झाडे असून ही झाडे शाळा परिसरात  असल्याने विद्यार्थ्यासाठी त्यांचा सावलीसाठी उपयोग होतो तसेच शाळा परिसरात झाडे असल्याने शालेय वातावरण प्रसन्न वाटते.झाडे लवण्यासाठी व त्यांचे संगोपनासाठी खूप परिश्रम घेतले जात असते परंतु याचा विचार न करता अज्ञात व्यक्तींनी सदर झाडांच्या फांद्या तोडल्या च परंतु त्या झाडांची शेंडे सुध्दा तोडल्या हे कृत्य किती निष्काळजीपणा चे आहे हे या झाडाकडे पाहून आपणास कळेलच .गावात असणाऱ्या झाडाची अशी अवस्था करणे हे योग्य नाहीच परंतु असे प्रकार होणार नाहीत म्हणून लक्ष ठेवणे हे ग्रामस्थांचेही कर्तव्य आहे.कारण या शाळेत शिकणारी मुले ही इतर खाजगी शाळेत  पालकांना आर्थिक बोजा न पडवणारे असल्याने या शाळेत दाखल केलेली मुले शिकत आहेत. अशा मुलांच्या या शाळेत मोठी झाडे झालेली असतानाही त्याची अशी दुरवस्था करणे व अशा दुरावस्था करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे त्यांना परावर्त करण्याचा कोणीही प्रयत्न न करणे हे गावातील ग्रामस्थांना व जाणकारांना अयोग्य वाटणारे कृत्य झाल्याचे दिसून येत आहे. जर अशाच प्रकारे या शाळांची दुरवस्था काही अज्ञात लोक करीत असतील तर या शाळेत शिकणारी गरिबांची मुले भविष्यात  कशी सुरक्षित राहतील. शाळेची अशीच दुरवस्था होत गेली तर  गावातील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न भविष्यात अडचणीचा होत जाणार  अशी जन माणसांमध्ये चर्चा  आहे.
close