वालचंदनगरच्या माजी सरपंच सौ छाया दादासाहेब मोरे यांना टॉप 100 2022 इन्फ्लुइंटल इंडियन्स अवॉर्ड्स पुरस्कार.
इंदापूर प्रतिनिधी: हैपेजे मीडिया इंडिया यांनी पुढाकार घेवून ज्या भारतीय लोकांनी सामाजिक प्रेरणादायी काम केले आहे त्यांना टॉप 100 2022 इन्फ्लुइंटल इंडियन्स अवार्ड पुरस्काराने सन्मानित केले आहे.
यामध्ये टॉप 100 2022 इन्फ्लुइंटल इंडियन्स अवार्ड पुरस्काराने वालचंदनगरच्या माजी सरपंच सौ छाया दादासाहेब मोरे यांना सन्मानित करण्यात आले.
यामध्ये विज्ञान,शिक्षण,सामाजिक ,सोशल बिस्नेसचे प्रेरणादायी काम केले आहे व जनतेच्या हितासाठी कायम काम केले आहे अशा व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वालचंदनगरच्या माजी सरपंच सौ छाया दादासाहेब मोरे यांनी त्यांनी केलेल्या सामाजिक काम व कोरोना काळातील केलेली लोकांची मदत व समाज उपयोगी कामासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.महिला सशक्तीकरण,बाल विवाह,आरोग्य अशा अनेक प्रश्नावरती माजी सरपंच सौ छाया मोरे यांनी काम केले. ग्रामपंचायत सरपंच असताना त्यांनी अनेक समाज उपयोगी व जनतेच्या हिताची त्यांनी कामे केली.
जो हा पुरस्कार मिळालेला आहे तो माझा नाही तर तो समस्त वालचंदनगर मधील जनतेचा सन्मान आहे असे सौ छाया मोरे यांनी सांगितले.
देशातील अनेक नामांकित व्यक्ती जसे डॉक्टर प्रशांत अरुण, डॉक्टर रंजन यादव, जावेद खान, वाल्मिकी हरे कृष्णा, पल्लवी वालिया राज अशा विवध क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित व्यक्तीला सदरचे पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहेत.

