shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन ला राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने सन्मानित..!


जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई । डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित पहिले राज्यस्तरीय अधिवेशन व  राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्कार पुस्तकांच गाव भिलार, महाबळेश्वर सातारा येथे आयोजित केला होता.

या महागौरव पुरस्कार मध्ये संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ श्रीकांत शिंदे सहकार्याने डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. श्री चंन्द्रकांत पाटील, पालकमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री दिपक केसरकर तसेच खासदार श्री निवास पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना.श्री चंन्द्रकांत पाटील, पालकमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री दिपक केसरकर तसेच खासदार श्री निवास पाटील, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना अध्यक्ष मा.राजा माने व डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन टीम उपस्थित होते.
close