shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवा क्रांती प्रतिष्ठानच्यावतीने पत्रकारांना दीपावली निमित्त लेखणी व मिठाईसह दिल्या शुभेच्छा.युवा क्रांती प्रतिष्ठानने अनेक गोरगरिबा पर्यंत पोहोचून दिवाळी केली गोड.

युवा क्रांती प्रतिष्ठानच्यावतीने पत्रकारांना दीपावली निमित्त लेखणी व मिठाईसह दिल्या शुभेच्छा.

युवा क्रांती प्रतिष्ठानने अनेक गोरगरिबा पर्यंत पोहोचून दिवाळी केली गोड.

 इंदापूर प्रतिनिधी. :- युवा क्रांती प्रतिष्ठान इंदापूर तालुक्यात अनेक जनतेचे गोरगरीब, अनाथ,वृद्ध गृहस्थ यांचे प्रश्न व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर आसणारे राजकारण विरहित संस्था आसून यांच्या माध्यमातून आनेक गरजू लोकांपर्यंत मदत पोहचतआहे. 
 तसेच दीपावली निमित्त इंदापूर तालुक्यातील पत्रकारांना दीपावलीच्या  शुभेच्छासह  फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच पत्रकारांचा सन्मान पत्रकारितेचे प्रतीक असलेला लेखणी पेन देऊन करण्यात आला .यावेळी पत्रकार उपस्थित होते.पत्रकारितेचा सन्मान करताना इंदापूर येथील प्रसिध्द आर्किटेक्ट व युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंतराव माळुंजकर व युवा क्रांती प्रतिष्ठानचे व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर आसणारे गोरगरीब जनतेचे कैवारी मा.नगरसेवक प्रशांत  सिताप, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारे बाळासाहेब क्षीरसागर यांचे हस्ते करण्यात आला.                      
या कार्यक्रमास आरपीआय नेते संदिपान कडवळे ,सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, विकास  खिलारे उपस्थित होते. याप्रसंगी रोट्रीयन मोरेश्वर कोकरे यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पत्रकार संदेश शहा, सुरेश जकाते, संपादक धनंजय कळमकर,शैलेश काटे,महेश स्वामी, सुरेश मिसाळ,राहुल ढवळे, सागर शिंदे, सिद्धार्थ मखरे, श्रेयस नलवडे,इम्तियाज मुलाणी,जितेंद्र जाधव, विजय शिंदे, जावेदभाई शेख, निलेश भोंग, दीपक खिलारे,भगवान मोरे,सह इतर मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
close