इंदापूर तालुक्यात धनगर ऐक्य परिषद समन्वय समितीच्या वतीने आरक्षणा संदर्भात गावोगावी घोंगडी बैठक .
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ रोजी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी इंदापूर तालुका धनगर परिषदेच्या समन्वय समितीचे सदस्य संजय रुपनवर, नानासाहेब खरात, विशाल मारकड , श्रीनिवास सातपुते,दिलीप पाटील, मोरेश्वर कोकरे, आप्पा माने, सिताराम जानकर ,कुंडलिक कचरे,विष्णू पाटील, बापूराव पाटील , तुकाराम करे , शाहीर करे, गणपत करे ,लक्ष्मण देवकाते उपस्थित होते.
धनगर ऐक्य परिषदेचे डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, इंदापूर तालुका धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने इंदापूर तालुक्यामध्ये उद्यापासून धनगर समाजाच्या या आरक्षणाच्या लढाईसाठी घोंगडी बैठकीचे प्रत्येक गावामध्ये ऐक्य परिषदेच्या समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून हा कोणत्याही राजकीय पक्षाने न सोडवल्यामुळे पुन्हा एकदा या प्रश्नाला ज्वलंत करण्यासाठी इंदापूर तालुक्यातून खऱ्या अर्थाने उद्यापासून या आंदोलनाला व्यापक स्वरूप या संपूर्ण महाराष्ट्रभर देण्यासाठी त्याची सुरुवात इंदापूर मधून आम्ही करतोय आणि त्यासाठी आज या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्र सरकारला आवाहन करतोय. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न सातत्याने प्रत्येक राजकीय पक्षाने आम्ही सोडवणार, सत्तेत आल्यानंतर प्रत्येक पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आश्वासित केलं. या समाजाचा मूळ प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही निर्णयापर्यंत पोहोचले नाही आणि म्हणून आत्ता आम्ही ठरवलं की लढाई आता आरपारची जर १३ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने भारतातील पाच राज्यांमध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार किंवा इंग्रजी स्पेलिंग मिस्टेक ही दुरुस्ती करून पाच राज्यातील बारा समुदायांना अनुसूचित जमातीच्या सवलती आरक्षणांमध्ये अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने निर्णय घेतला. तसाच प्रश्न महाराष्ट्रातील धनगर समाजाचा आहे" र "आणि" ड "चा फरक हा शब्द उच्चार झाल्यामुळे सत्तर वर्ष धनगर समाज आरक्षणासाठी झगडतोय आणि हा प्रश्न देखील जसा पाच राज्यातील इतर समाजाच्या इंग्रजी स्पेलिंग मिस्टेक, काना, मात्रा दुरुस्ती केल्या तसाच महाराष्ट्र सरकारमधी सुद्धा धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावावा अशी भूमिका आम्ही सातत्याने घेतलेली आहे आणि त्या दृष्टीनेच आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही .जर पाच राज्यात मिळत तर महाराष्ट्रात काय मिळत नाही हा पवित्रा घेऊन आम्ही लढायला सुरुवात करतोय अशा शब्दात पत्रकार परिषदेत त्यांनी मत व्यक्त केले.