उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे चौगुले असोसिएट व लॉ फर्मचे उद्घाटन
पुणे : पुणे येथील नाशिकफाटा पिंपरी येथे चौगुले ॲण्ड असोसिएट लॉ फर्मचे उद्घाटन, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी शुभेच्छा देताना अजित पवार म्हणाले की,
चौगुले ॲण्ड असोसिएट लॉ फर्म न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात, दर्जेदार सेवा आणि न्यायासाठी निष्ठेनं काम करतील, असा विश्वास आहे.
चौगुले लॉ फर्मचे उद्धाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधीमंडळ उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार अमित गोरखे, विधिमंडळ सदस्य योगेश बहल माजी महापौर पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी विरोधी पक्षनेता पिंपरी चिंचवड राहुल भोसले, विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड नाना काटे, पिंपरी चिंचवड नगरसेवक श्याम लांडे, कुणाल लांडगे, सौ.आशा ताई शेंडगे, यशवंत भाऊ भोसले कामगार नेते महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.
यावेळी चौगुले परिवाराच्या वतीने .महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राचार्य
मच्छिंद्र चौगुले, लॉ फर्मचे अड. सचिन चौगुले, अड. रविंद्र चौगुले, अड. अंजली चौगुले व मित्र परिवाराने आलेल्या मान्यवरांचा सन्मान केला.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदापूरचे माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पवार, मनोज पवार, शिवदत्त जनकल्याण ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष सचिन चौगुले व मान्यवर उपस्थित होते.