shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज मतदार संघातील तांडा वस्त्यांसाठी दिड कोटींची कामे मंजूर; आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश!!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मराठवाड्यातील अनेक विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये केज विधानसभा मतदार संघातील कामांचा विशेषत्वाने समावेश असून या कामांसाठी शासनाने दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 



वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत शासनाने मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या कामांना शासनाने सोमवारी (२५ ऑगस्ट) मान्यता देत निधी मंजूर केला. यामध्ये आमदार नमिता मुंदडा यांचा सततचा पत्रव्यवहार लक्षात घेता शासनाने केज मतदार संघातील तांडा वस्ती सुधारकामांसाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

या निधीतून जोला, नाव्होली, सारणी (सां), साळेगाव, युसुफ वडगाव, सुर्डी, डोंगर पिंपळा, काळवटी तांडा, उमराई, केंद्रेवाडी, डीघोळ आंबा आणि आंबील वडगाव या ठिकाणच्या वस्त्यांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम आणि पेव्हर ब्लॉक बसवणे अशा प्रकारची कामे होणार आहेत.

दरम्यान, निधी मंजूर करून स्थानिक भागातील विकास कामांना गती दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आजत  पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, ना. पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

close