"विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकासासोबतच शारीरिक स्वास्थ्य टिकवणे हेच आमचे ध्येय आहे"
- श्री. योगेश महाजन, संचालक शितल अकॅडमी
एरंडोल (प्रतिनिधी) – शहरातील माळी वाडा येथील शितल अकॅडमीतर्फे शुक्रवार व शनिवार रोजी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेकडो नागरिकांनी हजेरी लावत विविध तपासण्या करून घेतल्या.
या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, बीएमआय, ईसीजी यांसारख्या महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आरोग्य सल्ला सत्रही घेण्यात आले.
संचालक श्री. योगेश महाजन यांनी सांगितले की, “आरोग्य ही खरी संपत्ती आहे. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी कटिबद्ध आहोत.”
शिबिराच्या शेवटी सर्व सहभागी नागरिकांना आरोग्य सल्ला पुस्तिका तसेच आवश्यक औषधे मोफत देण्यात आली. शैक्षणिक वर्षभर अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन शितल अकॅडमीमार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.