shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बीजपुत्र अमोल डाके यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद ; विना मोबदला बीया वाटून लाखो झाडे केली तयार

निसर्गाच्या सानिध्ध्यात रमणारा असाही एक अवलिया

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : ३० /   कोविड काळामध्ये सामाजिक काम म्हणून सोशल डिस्टन्स ठेवत मास्क, ग्लोज, सॅनिटायझर चा वापर करत किराणा दुकान, लॅब, कॉलेज, पोलिस स्टेशन, हॉस्पिटल, शाळा, सेतू सुविधा केंद्र, सरकारी कार्यालय, मेडिकल, विद्यालय, शेतकऱ्यांच्या दुध डेअरी, कृषी सेवा केंद्र, मार्केटच्या कांदा आडत व भाजीपाला आडत, कॉम्प्युटर रिपेअरिंग, प्रिंटर रिपेअरिंग, लॅपटॉप रिपेअरिंग टोनर कार्टेज रिफिलिंग, इंटरनेट सेवेचे काम करत असताना एकही दिवस घरी न राहता वेगवेगळ्या झाडांचे बीया जमा करून झाडे लावण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना, वेगवेगळ्या सरकारी खाजगी संस्थाना मागेल त्यांना झाडांच्या बियांचा कोणताही मोबदला न घेता बियांची वाटप केली. 

 बीजपुत्र अमोल डाके यांनी वेगवेगळ्या झाडांच्या बिया बरोबर कॉसमॉस व डेलियाची फुलाच्या झाडांचे बीया वेळ मिळेल तसे नगर जवळ परिसरातील रस्ते, किल्ला, शाळा, मंदिर, डोंगर, मोकळ्या जागा असेल तिथे टाकले आहेत.  अहमदाबाद वरुन येत असताना दोन हजार आठरा मध्ये काही ठिकाणी बीजपुत्र अमोल डाकेना कॉसमॉस व डेलिया झाडांचे फुले दिसले होते त्यांनी ती झाडांची फुले तोडून घरी आणले.  नगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फुले टाकले. आज नगरमध्ये सर्व ठिकाणी लाखोंनी झाडे तयार झाली आहेत.

 कॉसमॉस व डेलियाची झाडे जून व जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर उगतात नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत राहतात.  ज्या ठिकाणी झाड उगले आहे त्या ठिकाणी झाडांचे फुले जास्त पडून जास्त प्रमाणात झाडाचे प्रमाण वाढतं चाललंय, पावसाच्या पाण्यामुळे झाडाची फुले वेगवेगळ्या ठिकाणी वाहुन गेल्यामुळे झाडाचे प्रमाण वाढण्यास मदत होते आहे असे अमोल सांगतात.नगर येथील सर्व परिसरात कॉसमॉस व डेलियाची फुललेली फुले लक्षवेधी ठरत आहेत.
close