shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक कार्यकर्त्या पुनमताई गायकवाड सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित

शौकतभाई शेख श्रीरामपूर :-

 तालुक्यातील वडाळा महादेव येथील सामाजिक कार्यकर्त्या पुनमताई गायकवाड यांना नुकताच पुणे (वाणवडी) येथील वी.बी.इव्हेंट व केदारी ग्रुप च्या वतीने सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दरवर्षी सामाजिक, राजकीय, आर्थिक,शैक्षणिक संस्था मध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्या निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील पुनमताई गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्याचा पुरस्कार नुकताच पुणे (वाणवडी) या ठिकाणी प्रमुख पाहुणे शाहिदा हिजाबी क्वीन यांच्या हस्ते  देण्यात आला, पुनमताई गायकवाड या आरपीआय वडार समाज आघाडीच्या माध्यमातून वडार समाजातील महिला भगिनी च्या न्याय हक्कासाठी त्यांनी वडार समाजात मोठे संघटन अहमदनगर जिल्ह्यात उभारले,
त्यांच्या कार्याची दखल घेऊन पूणे येथे त्यांना हा पुरस्कार  प्रदान करण्यात आला. 
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल अनेक मान्यावरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यात प्रामुख्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले, महसूलमंत्री ना.राधाकुष्ण विखे-पाटील, खासदार.सदाशिव लोखंडे, श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेन्द्रभाऊ थोरात, विभागीय जिल्हाध्यक्ष भिमाभाऊ बागुल, रमाताई धिवर,शंकर शेलार, सुनिल शिरसाट,विजय पवार, सुहास राठोड, राजु गायकवाड, मनोज काळे,मोहन आव्हाड,सोनु राठोड ,सारिका मोरे,सविता शेलार आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या,वी.बी. इव्हेंटच्या वृंदा भंडारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
close