पाथर्डी( प्रतिनिधी):- शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे...... शेतकरीविरोधी शासनाचा धिक्कार असो...... अतिवृष्टीच्या पिकाची नुकसान भरपाई त्वरित जमा करा...... अशा घोषणांनी तहसील कार्यालय दणाणून निघाले शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कोरडगावचे लोकनियुक्त सरपंच भोरू म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तहसील कार्यालयात मोर्चा काढून तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन देण्यात आले.
(छाया-अजय गांधी)
कोरडगाव येथील नाणी नदीवर नवीन पूल बसवण्यात यावा, अतिवृष्टीमुळे व्यवसायिकांचे झालेले नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी , सुसरा रोड चे काम जलद गतीने व्हावे, औरंगपूर बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करावी परीसरातील शेतकरी व नागरीकांच्या विवीध मागण्याचे निवेदन तहसीलदार ऊद्धव नाईक यांना देण्यात आले . त्यावेळी सरपंच भोरु म्हस्के म्हणाले . मागील एक महीण्या पुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीन भागातील शेतकरी पुर्णपणे उध्वस्त झाला आहे.या भयानक अतिवृष्टीमुळे गुरे, जमिनी सर्व वाहुन गेल आहे. गेल्या पन्नास वर्षात असा पाऊस झाला नव्हता, शासनाने दिवाळी पुर्वी मदत देण्याचे जाहीर केले मात्र दिवाळी होऊन चार दिवस झाले तरी कोणतीही मदत मिळाली नाही.
शासनाने त्वरीत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी तसेच कोरडगाव परिसरात अनेक नागरी समस्या आहेत त्याचे त्वरित निवारण करावे असे म्हस्के म्हणाले. यावेळी विविध मान्यवरांचे भाषणे झाली.कोरडगाव चे उपसरपंच प्रताप देशमुख, काकासाहेब देशमुख, शिवसेनेचे आंबादास आरोळे, नवनाथ चव्हाण मा. नगरसेवक तुकाराम पवार, नंदकुमार डाळींबकर, रमेश जोशी,उद्योजक लहु पवार,खर चे सरपंच दादासाहेब किलबिले ,तोंडोळी चे उपसरपंच सतीश वारुंगुळे, कळस पिंपरीचे मा. सरपंच बद्रीनाथ येढे, कोळसांगवी चे मा. सरपंच दगडू धनवडे, कोरडगाव चे उपसरपंच प्रताप देशमुख ,चांदगाव चे सरपंच रणजीत बांगर, कोळसांगवी चे चेअरमन भाऊसाहेब घुले, ग्रामपंचायत सदस्य अनिल ससाने, नागनाथ वाळके,, जालिंदर मुखेकर, स्वराज बोंद्रे ,प्रकाश फुंदे , युनुस शेख , पै सुरेश जाधव, गणेश कावळे ,सुरेश जाधव ,अंबादास माळी, अविनाश घुले ,योगेश गीते, आदींसह मोठ्या संख्येने परीसरातील नागरीका व शेतकरी उपस्थित होते.

