shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री.आदिनाथ महाराज सैतवाळ दिगंबर जैन बुबणे मंदिराचा जलकुंभ व पालखी सोहळा संपन्न


प्रतिनिधी : आसावरी वायकर

सोलापूर : १७ /    येथील श्री.आदिनाथ महाराज सैतवाळ दिगंबर जैन बुबणे मंदिराचा जलकुंभ व पालखी सोहळा उत्साही तथा भक्तिमय वातावरणात पार पडला.

जल- कुंभ घेण्याचा मान सौ.अश्विनी सुनील जुनवणे यांना तर, पालखीत शास्त्र विराजमान करण्याचा मान, सौ. मनीषा किशोर म्हेत्रे यांना मिळाला.

पर्युषण पर्व सांगता समारंभा निमित्त आयोजित या पालखी शोभायात्रेत,बुबणे मंदिराचे विश्वस्त हर्षवर्धन बुबणे, किशोर म्हेत्रे,पं. विजयकुमार काळेगोरे, बाहुबली जि.पुर्वत, अरुण धुमाळ, शरद बुबणे, राजू देशमाने,राजेश मोहोळकर, रवींद्र भूमकर, बाहुबली भूमकर, नंदकुमार रणदिवे, अनुप म्हेत्रे, हेमंत म्हेत्रे, अनंतकुमार रणदिवे, सुनील थळवे, भूषण आहेरककर, अरविंद क्षीरसागर, चेतन तुपकर  यांच्यासह सुमारे १५० समाज बंधू-भगिनींची उपस्थिती होत्या.
close