शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. सोमवार दिनांक १७ ऑक्टोंबर २०२२
देवळाली प्रवरा प्रहार, पक्षाच्यावतीने ढुस यांचेवरील खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा जाहीर निषेध..!!
राहुरी : महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच श्रीरामपूर प्रहार जनशक्ती पक्ष विधानसभेचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांना बदनाम करण्याच्या व त्यांची प्रभावी राजकीय घोडदौड थांबविण्यासाठी द्वेषापोटी ॲट्रॉसिटी सारख्या कायद्याचा गैरवापर होत असेल, तर ही संपुर्ण देशाच्या दृष्टीने निंदनीय बाब आहे. ज्या व्यक्तीने जीवाची पर्वा न करता देशासाठी सुवर्ण पदक मिळविले. अशा व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल होत असेल तर ही बाब गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे असल्याने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राहूरीचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देवून जाहीर निषेध व्यक्त करणायत आला.
निवेदनावर प्रहार श्रीरामपूर विधानसभा मदारसंघ कामगार सेलचे प्रमुख बाळासाहेब कराळे, प्रहार देवळाली प्रवरा शहराध्यक्ष विजय कुमावत, राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, गणेश भालके, माहिला शहर अध्यक्ष भाग्यश्री कदम, उपाध्यक्ष वंदना कांबळे, अफसाना शेख, संघटक सुनील कदम आदींच्या सह्या आहेत.
निवेदानात म्हटले आहे की, आमचा न्याय व्यवस्थेवर व पोलीस प्रशासनावर पुर्ण विश्वास असुन सदरील गुन्हयाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीन जनतेची वर्षोनुवर्षे प्रलंबित असलेली कामे सुटण्यास सुरुवात झाली. या झंझावाताचा फटका प्रस्थापितांना बसत असल्याने सूडबुद्धीने सामाजिक तेढ निर्माण करून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या उद्देशाने, संरक्षणासाठी असलेल्या ॲट्रॉसिटीसारख्या कायद्याचा गैरवापर करून ढूस यांचेवर खोटा गुन्हा दाखल केला गेला आहे. मात्र असे खोटे गुन्हे दाखल करून आम्ही समाजातील गोरगरीब जनतेच्या विकासासाठी उचलेला वसा अर्धवट सोडणारे नाही.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, वास्तविकता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी म्हणजेच दि.११ ऑक्टोबर रोजीच सदर इसमाने आप्पासाहेब ढुस यांच्या घरी जाऊन त्यांना जीवे मारण्याची व ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन अरेरावी करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबाबत दि. ११ ऑक्टोबर रोजीच संध्याकाळी देवळाली पोलीस ठाण्यात ढुस यांनी रितसर तक्रार दाखल केलेली आहे. मात्र दि. १२ ऑक्टोबरच्या रात्री म्हणजे २४ तास उलटल्यानंतर सदर इसमाने आप्पासाहेब ढुस यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. या मधल्या २४ तासात या इसमाला ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी कुठून खतपाणी मिळाले ही संशास्पद बाब असुन त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
न्यायदेवतेवर व पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास असून पोलीस प्रशासन योग्य तो तपास करतील यात मुळीच शंका नाही. त्यामुळे तपासांती "दुध का दुध और पानी का पानी" ते स्पष्ट होईल.
आमचे ह्रदय सम्राट, खंबीर नेतृत्व माजी मंत्री आदरणीय बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सामाजिक सेवेची अखंड ज्योत यापुढेही तेवतच राहील...!
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगले काम करणाऱ्या लोकांवर चिखलफेक आणि खोटे गुन्हे दाखल करून प्रतिमा मलीन करण्याचे काम होत असते तथापि खोटी अट्रोसिटी चिंतेची बाब आहे. त्यामूळे पोलिस प्रशासनाने सखोल चौकशी करून या खोट्या अट्रोसिटी चे वास्तव समोर आणावे ही विनंति.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600