shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जीवनसाथी दिवाळी विशेषांकाचे मोठ्या थाटामाटात प्रकाशन

विश्वस्त चारुकीर्ती शिरसोडे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न ...

प्रतिनिधी : आसावरी वायकर

सोलापूर : १७ /   श्री.दिगंबर जैन सैतवाळ सेवा मंडळ सोलापूर संचालित जीवन साथी मासिकाच्या दिवाळी विशेषांकाचे थाटामाटात व उत्साहात प्रकाशन करण्यात आले.
 
प्रथमतः श्री. दिगंबर जैन बुबणे मंदिराचे अध्यक्ष हर्षवर्धन बुबणे यांच्या हस्ते आदिनाथ भगवंतांचा अभिषेक करण्यात आला. पूजाविधी, जप- जाप्य इ. धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडल्यानंतर मंदिराचे विश्वस्त चारुकीर्ती शिरसोडे यांच्या हस्ते जीवनसाथी दिवाळी विशेषांकाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

सेवा मंडळाचे सचिव अरुण कुमार धुमाळ यांनी सर्वांचे आदरपूर्वक स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री.दि. जैन बुबणे मंदिरात पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यासाठी मंदिराचे विश्वस्त हर्षवर्धन बुबणे, किशोर म्हेत्रे,पं विजयकुमार काळेगोरे, सेवा मंडळाचे अध्यक्ष राजू देशमाने, उपाध्यक्ष प्रदीप पांढरे, कोषाध्यक्ष सूर्यकांत जामगावकर, सहकोषाध्यक्ष राजेश मोहोळकर, सदस्य अमित अ.कटके, सदस्या सौ.मीना आळंदकर, सौ. अमिता र. कटके, जीवनसाथीचे प्रमुख संपादक इंजि. बाहुबली जि. पुर्वत, सदस्य प्रा.चेतन तुपकर, सेवा मंडळ समिती सदस्य नितीन पलसे, चंद्रकांत मांडवकर, सौ. कमल बा.पुर्वत इ. श्रावक- श्राविका उपस्थित होत्या.

विशेषांकाचे निरीक्षण करुन मंदिर विश्वस्तांनी मार्गदर्शन केले. सेवा मंडळ अध्यक्ष राजू देशमाने यांनी आभार मानले.
close