इंदापूर नगरपालिकेला इंडियन स्वच्छता लीगमध्ये विशेष बहुमान*
इंदापूर प्रतिनिधी: इंडियन स्वच्छता लीग ही भारतातील पहिली आंतर-शहर स्पर्धा आहे ज्याचे नेतृत्व युवकांनी कचरामुक्त शहरे बनवण्याच्या दिशेने केले आहे. १७ सप्टेंबर रोजी हाती घेण्यात येणार्या उपक्रमांचे नियोजन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 'विशेष उल्लेखनीय गुणगौरव' या पुरस्काराने इंदापूर नगरपरिषदेचा गुणगौरव करण्यात आला. मुख्याधिकारी राम कापरे यांनी पुरस्कार स्वीकारला.
पुणे जिल्ह्यातील ५ शहरांना स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ अंतर्गत विविध श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील वर्षीही या अभियानांतर्गत नागरिकांच्या सहभागातून या वर्षापेक्षा चांगली कामगिरी होईल, असा विश्वास मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

