वडापुरी गावाच्या नावाचं वैभवास कसलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी - इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर.
श्री.विठ्ठल मित्र मंडळ वडापुरी आयोजीत भव्य तीन दिवसीय खुल्या नृत्य स्पर्धेचे उद्घाटन इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर हस्ते संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: भव्य नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम आजचा उद्याचा व परवाचा उत्साह पूर्ण वातावरणामध्ये साजरा करावा आणि वडापुरी गावाच्या नावाचं वैभव आहे त्याला कसलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे असे इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वडापुरी येथे श्री विठ्ठल मित्र मंडळ वडापुरी आयोजीत भव्य खुल्या नृत्य स्पर्धेचे उद्घाटन इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या हस्ते ( दि.१ अक्टो) सायंकाळी करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केले.
ही खुली नृत्य स्पर्धेचे आयोजन १ ऑक्टोंबर २०२२ या दिवशी लहान गट वयोगट३ते १२ वर्ष तर२ ऑक्टोंबर २०२२ रोजी मोठा गट वयोगट १३ वर्षापुढील मुला मुलींचा नृत्याचे आयोजन करण्यात आले असून लहान गटासाठी प्रथम पारितोषक५५५५ प्रमाणपत्र व चषक संभाजीराजे उद्योग समूह चे सचिन सुखदेव पवार यांच्या वतीने तर
द्वितीय पारितोषक ४४४४ प्रमाणपत्र चषक न्यू साई फॅब्रिकेशन चे खुदबुद्दीन नसीर शेख तृतीय पारितोषिक ३३३३ प्रमाणपत्र चषक मॅनेजर साहिल हजरत पठाण यांच्या वतीने देण्यात येणार असून मोठ्या गटास प्रथम पारितोषक २११११ प्रमाणपत्र चषक श्रीनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालिका सविता ज्ञानेश्वर काटकर तर द्वितीय पारितोषक१७७७७ प्रमाणपत्र चषक युवा उद्योजक हरिदास ब्रह्मदेव गवळी व तृतीय पारितोषक१११११ प्रमाणपत्र चषक युवा उद्योजक शरद अशोक कामटे यांच्या वतीने देण्यात येणार असून हे वितरण ३ ऑक्टोबर २०२२ रोजी अंतिम नृत्य स्पर्धा झाल्यानंतर होणार आहेत. या कार्यक्रमास विशेष सहकार्य बर्गे कंट्रक्शन इंदापूर ,संतोष देशमुख युवा नेते, पांडुरंग शिर्के युवा नेते, भागवत काटकर युवा नेते, धीरज काटकर श्रीनाथ कार्यकारी सेवा सोसायटी संचालक ,रहमान शेख साई उद्योग समूह इंदापूर, महेश देशमुख युवा नेते, प्रशांत शिर्के उद्योजक, किशोर पाटील ,अब्दुलगणी मुलानी युवा नेते ,महेश शेलार श्रीनाथ बॅटरीज वडापुरी, अक्षय बागल मॅक्स मेन्स वेअर अकलूज, शत्रुघन बागल युवा नेते, आजिनाथ कदम युवा उद्योजक, शहाजी तपासे मुख्याध्यापक श्रीनाथ विद्यालय, सिद्धनाथ एक्वा वडापुरी, महाराजा उद्योग समूह इंदापूर, बापू काटकर, नसीर शेख व इतर ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या उद्घाटनाप्रसंगी इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की,आजचा हा लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सर्व वडापुरी च्या ग्रामस्थांनी अतिशय उत्साह वातावरणात या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी इंदापूर पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे या कार्यक्रमाला कसल्याही प्रकारचा गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्यावर इफेक्टिव कारवाई करण्यात येईल. हा कार्यक्रम बालगोपालांचा कार्यक्रम आहे लहानापासून थोरापर्यंत सर्व माता भगिनींचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला कोणीही गालबोट लावू नये जर कोणी तसा प्रयत्न केला तर तो प्रयत्न हाणून पाडण्यात येईल .इफेक्टिव अशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे .हा कार्यक्रम आजचा उद्याचा व परवाचा उत्साह पूर्ण वातावरणामध्ये साजरा करावा आणि वडापुरी गावाच्या नावाचं वैभव आहे त्याला कसलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे.
या कार्यक्रमास मुक्तार मुलानी, प्रशांत उंबरे पैलवान पठाण व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू चंदनशिवे यांनी केले.
यानंतर लहान गटातील कलाकारांनी आपले नृत्य सादर केले. यावेळी गावातील लहान थोर पुरुष महिला यांचा मोठा सहभाग दिसून आला.

