shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रात रक्षक पोलिसच आहेत खरे दुर्लक्षित ..!

      अ.नगर जिल्ह्यात दोन पोलीसांनी आत्महत्या केल्या पण बातम्या काही फारशा गाजल्या नाहीत. कोण कमी पडले..? मिडीया, वृत्तपत्रे का महत्व नसलेला पोलिस...!
 एखादा पुढारी, नेता हृदय (नसलेला) किरकोळ विकाराने जरी मृत्यूमुखी पडला असता तर कमीत कमी आठवडाभर पोलिसांना काम लागले असते व मेलेल्या नेत्यांच्या वारसदारांना भरमसाट मदत दिली गेली असती, व घरातील बाप मेला असा टाहो फोडला असता पण पोलिसांचा मेला तर मेला त्यांचे घरी काय परीस्थिती आहे.., त्यांचे वारसाला नका मदत करू... पण त्याचे दुःखात सहभागी असल्याचा अभिनय तरी करा..., तसे नेते अभिनय करण्यात पटाईत असतात पण त्यांना पोलीस बांधवांसाठी वेळ नाही.... फक्त प्रसिद्ध हवी आहे...., मयत पोलिसाचे नातेवाईक आशेने दाराकडे टक लावून पाहत आहेत येईल कोणतातरी नेता...!
देईल आम्हांला आश्वासन.. पुसीन आमचे डोळे पण डोळे रडुन रडुन कोरडे पडले तरी नेत्यांच्या हृदयाला पाझर काही सुटेना..., मयताचे कुटूंब न्याय मागत आहे... मग कधी संपणार त्यांचा वनवास....! त्यांचे दुःख त्यांनाच माहीती ..., त्यांच्या मनातील धगधगत्या अग्नी मध्ये समुद्र सुध्दा सुकुन जाईल... फक्त नेत्यांना लाल दिवा.... लवा जमा पाहिजे..!


पोलिस पण मतदार आहे... हे विसरू नका ...,मयत पोलिसांचे नातेवाईक यांनी साखळी पध्दतीने नेत्यांच्या विरोधात प्रचार केला तरी एक पोलिस कुटुंब शंभर लोकांना व ते शंभर पुढचे असा प्रचार केला तरच ह्या मदमस्त हात्तीला वठनीवर आणता येईल...!  पोलिस बॉईज.., निवृत्त पोलिस यांनी ह्या नेत्यांना जागे करण्यासाठी रणशिंग फुंकले पाहिजे...., शेतकरी वर्षभर बैलाकडून काम करुन घेतो.. पण निदान बैलपोळ्याला बैलांच्या पाठीवर मायेने हात फीरुन म्हणतो.. बाबा चुकून तुला चाबूक मारला असेल तर मला माफ कर ...,व त्या मुक्या प्राण्यांला पुरणपोळी खाऊ घालतो तसा मायेचा हात कोणी पोलिस कुटुंबाला देईल का....??

पोलिसांच्या सेवा बाबत कोणीच विचार करीत नाही.. त्याला दिवाळी बोनस नको ....पण कुटुंब सुरक्षित हवं आहे...
 
असे म्हणतात महाभारतातील अभिमन्यु जन्माला येण्यापूर्वीच त्याला सहस्र हात होते पण श्री कृष्णाने गर्भातच त्याचे हात छाटले व त्यास चक्रव्यूहचे ज्ञान अर्धवट दिले...!
आधुनिक काळातला पोलिस पण अभिमन्यु आहे... तुच तुझ्या जबाबदारीवर काम कर.... चांगले केले तर वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली संकट आले तर तुच चक्रव्यूहातून निघ ही निती.... 

एखादा साधा नगरसेवक,सरपंच झाला तर त्याचे वर्षभरात टोलेजंग इमारती उभ्या रहातात...!
पोलिस मरमर संपूर्ण सेवा करतो तेव्हा कुठे त्याला छोटेसे छप्पर मिळते... पोलिसांचे मुळेच मंत्री, नेते, पुढारी सुरक्षित...., पोलिस मात्र असुरक्षितच....., कधी बदलणार हे....! शिक्षक लोकांसाठी आमदार पदवीधर मतदारसंघा साठी आमदार....!

पण पोलिसाचे प्रतिनीधीत्व करण्यासाठी कोण कामाच्या त्रासामुळे अनियमित आहार कीत्तेक कर्मचारी सेवानिवृत्त पुर्वीच आयुष्यातून निवृत्त झाले आहेत ज्यांनी देशसेवेसाठी आयुष्य झीजवले त्यांच्या पदरी शेवटी भोपळा एक मराठी गिते आठवते पतीर्वतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला सन्मान अजब तुझे सरकार शिक्षकाला पाच दिवसांचा आठवडा इतर कर्मचारी यांना पण भरपूर सुट्ट्या ठीक आहे पोलिसाना बोनस नाही तर मंग कमीतकमी इतर खात्याच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देता त्या बदल्यात पोलिस कर्मचाऱ्यांना त्या सुट्ट्याचा पगार द्यावा वर्षभरात कीती शनिवारी रविवारी दिवाळीच्या सुट्या यांचा हीशोब करून पोलिसांना रक्कम दिली तर कोणीच बोनस मागणार नाही लक्षात ठेवा राजकीय पक्ष नेते पुढारी मंत्री पोलिसा मुळेच तुम्ही सुरक्षित आहात पोलिसा मुळेच ...!

🙏से.नि स. फौ.राजगुरू🙏
close