मतिमंद व मूकबधिर शाळेतील मुलांच्या बरोबर दुर्लक्षितांची दिवाळी साजरी करून बालगोपाळांच्या चेहऱ्यावरती आनंद उमटवला - वसंतराव माळुंजकर.
युवा क्रांती प्रतिष्ठान व लेनेस क्लब सदस्यांच्या वतीने दुर्लक्षितांचे दिवाळी मतिमंद व मूकबधिर शाळेतील मुलांबरोबर साजरी करत केला मुलांचा आनंद द्विगुणित.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे गेली अकरा वर्षापासून युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने दुर्लक्षितांची दिवाळी साजरी करण्यात येत आहे. अशीच दुर्लक्ष त्यांची दिवाळी आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ रोजी श्री समर्थ व्यायाम शाळा संचलित मतिमंद आणि मूकबधिर शाळेतील मुलांना सुट्टी लागणार असल्याने या मुलांची दिवाळी युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात यावी या उद्देशाने येथील शाळेतील ७४ बालकांना युवा क्रांती प्रतिष्ठान च्या वतीने नाश्ता मिसळपावची पार्टी, आकाश कंदील, पणत्या लावून शाळा परिसर सजवण्यात आला व लीनेस क्लब आणि युवा क्रांती प्रतिष्ठान च्या भगिनी लीनेस क्लबच्या कॅबिनेट सदस्य सायरा आतार, तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात, जयश्रीताई खबाले, लिनस क्लब अध्यक्षा उज्वलाताई गायकवाड, विद्या काटे, शुभांगी देवकर, राधिका दुधाळ या महिलांनी मुलांना औक्षण करून पेढे भरवले.
यावेळी युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंतराव माळुंजकर, माजी अध्यक्ष धरमचंद लोढा, पियुष बोरा, असलम शेख, बाळासाहेब शिरसागर, मोरेश्वर कोकरे यांनी मुलांना दिवाळी फराळ देऊन शुभेच्छा दिली.
यावेळी युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा श्री समर्थ व्यायाम मंडळ संचलित मतिमंद आणि मूकबधिर शाळेचे उपाध्यक्ष वसंतराव माळुंजकर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, गेली अकरा वर्ष दुर्लक्षितांची दिवाळी हा उपक्रम साजरा करताना सालाबाद प्रमाणे याही वर्षी मतिमंद व मूकबधिर शाळेतील मुलांबरोबर दिवाळी साजरी करत आहोत. उपक्रम दुर्लक्षित लोकांसाठी आयोजित केला आहे. शाळेच्या उपाध्यक्ष या नात्याने मी युवा क्रांती प्रतिष्ठानचा अध्यक्ष असूनही युवा क्रांती प्रतिष्ठान चे सर्वांचे आभार मानतो हा छोटासा कार्यक्रम झाला बालगोपाळांच्या चेहऱ्यावरती आनंद उमटवला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो.
यावेळी युवा क्रांती प्रतिष्ठानचे प्रशांत सिताप म्हणाले की, समाजातील गरीब गरजू हातावरची पोट असणारी लोक वृद्धाश्रमातील किंवा परमेश्वराची लेकरं या सर्वांना बरोबर या दिवाळीचा आनंद द्विगणित करणे त्यांना आनंद देणे त्यानंतर कुटुंबामध्ये जाऊन दिवाळी साजरी करणे हा एक छोटासा उपक्रम दुर्लक्षतांची दिवाळी म्हणून युवा क्रांती प्रतिष्ठान गेली ११ वर्ष करीत आहे आपण सर्वांना विनंती की आपल्या सहभोवतालच जी गरीब गरजू असतील त्यांच्यासोबत या सणाचा आनंद लुटा आपला सण अतिशय चांगला निश्चितच होईल.
तसेच लिनेस क्लब कॅबिनेट सदस्य सायरा आतार यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, दिवाळी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दुर्लक्षितांची दिवाळी हा उपक्रम लिनेस क्लब व युवा क्रांती प्रतिष्ठान यांच्यावतीने साजरा करता असून हा उपक्रम सर्वांच्या सहकार्याने साजरा होत असतो. यामध्ये समाजातील सर्व बंधू भगिनी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानेही दुर्लक्षकांची दिवाळी साजरी करता येते. ज्यांचे कोणी नाही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे काम या माध्यमातून होत असल्याने तो आनंद मोजता न येण्यासारखे असते असे मत त्यांनी व्यक्त केले.