केज शहरातील सर्व सामान्य जनतेने एक वर्षा पुर्वि झालेल्या नगरपंचायतिच्या निवडणुकी मध्ये मोठ्या अपेक्षेने जनविकास परिवर्तन अघाडिला मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून दिले होते. काही नगरसेवक कमी पडल्यामुळे काँग्रेसने केज शहरातील विकासाच्या मुद्द्यावर जनविकास परिवर्तन आघाडीला पाठिंबाही दिला. व नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड झाली. सर्वसामान्य जनतेला केज शहरातील विकास कामे मार्गी लागतेल ही माफक अपेक्षा होती परंतु एक वर्ष झाले तरी पण कसलिही कामे होत नसल्याने जनविकास परिवर्तन आघाडीतिल विजयी झालेल्या सदस्या मध्येच मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे.
वार्ड क्रमांक आकराच्या नगरसेविका इनामदार तरमिमबेगम गज्जमफर यांनी त्यांच्या वार्डातिल व केज शहरातील पाईपलाईन दुरूस्ती तसेच सुरूळित पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ विकासात्मक कामे मार्गी लावावित यासाठी निवेदन दिले आहे. धनेगाव धरण भरले असूनही पंधरा पंधरा दिवस पाणी सुटत नाही. केज शहरातील घनकचरा व्यवस्थापन टेंडर मध्ये काय भ्रष्टाचार झाला आहे व टेंडर का रद्द झाले आहे याची लेखी माहिती देखील त्यांनी मागितली आहे. जनरल खाते, स्वच्छता खाते व पाणी पुरवठा खात्यामधिल खर्चाची लेखी माहिती देखील त्यांनी मागितली आहे. संबंधित नगराध्यक्षा व इंजिनिअर विकास कामे मार्गी लावावित यासाठी प्रयत्न करत नसल्याने लेखी तक्रार करावी लागत आहे असे पुढे त्यांनी आपल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे. केज शहरातील सत्ताधारी नगरसेवकच नगरपंचायतच्या कारभारा विरुद्ध आक्रमक झाल्यामुळे याची चविने चर्चा केज शहरातील नागरिकां मध्ये होत आहे.
केज शहरातील सर्वसामान्य जनतेने मोठ्या अपेक्षेने जनविकास परिवर्तन अघाडिला मतदान केले परंतु एक दिड वर्ष झाले तरी आमचे व अठरापघड जनतेची कामे होत नसल्याने आम्हाला जनविकास परिवर्तन अघाडि विरुद्ध अवाज उठवावा लागत आहे. व वेळप्रसंगि आम्हाला विरोधात ही जावे लागले तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. ..... *पप्पू अण्णा इनामदार . नगरसेवक केज.