शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२२
श्री क्षेत्र मोहटादेवी चरणी दोन कोटीचे दान..!!
अहमदनगर : राज्यभर प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर पार पडलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये लाखो भाविकांनी दर्शन घेऊन सुमारे दोन कोटी रुपयांचे दान अर्पण केले.
देवस्थानच्या दानपेट्यांची मोजदाद नुकतीच अहमदनगर येथील धर्मादाय आयुक्त यांचे प्रतिनिधी डॉ. डी. एस. आंधळे, देवस्थान विश्वस्त, पाथर्डी येथील सराफ काशिन्नाथ वामन शेवाळे, पोलिस व देवस्थान सुरक्षा व सीसीटीव्ही निगराणीत पार पडली.
४० तोळे सोनं यावेळी रोख रक्कम रुपये १ कोटी २७ लाख ६० हजार ५५४, तसेच सोने ४० तोळे मूल्यांकन रूपये १६ लाख ६४ हजार, चांदी वस्तू १३ किलो ८१० ग्रॅम मूल्यांकन रुपये ५ लाख १३ हजार ९९२, चांदीचे छत्र व पंचारती मूल्यांकन रुपये ३ लाख तसेच विविध देणगी पावती रुपये ४० लाख २९ हजार ९३०, ऑनलाइन स्वरुपात देणगी रुपये ४ लाख ८६ हजार २०३ प्राप्त झाले आहेत.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600