shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"भोसरी, पुणे येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत बाल चिमुकल्यांसाठी "बालदिन"(बालआनंद मेळावा) कार्यक्रम उत्साहात संपन्न..!

 भोसरी:-
विद्यार्थ्यांना आपल्या थोर पुरुषांविषयी माहिती व्हावी, बाल जीवनाचा निखळ आनंद प्राप्त व्हावा, शिक्षणाची ओझे हलके व्हावे,  चांगले संस्कार व्हावे, आदर्श, मूल्य रुजावीत, स्वच्छंदी शिक्षण मिळावे,  कल्पनाशक्तीचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

           दि/१४/११/२०२२ ते २०/१०/२०२२ रोजी "बाल दिनानिमित्त" शाळेमध्येसकाळी ११:०० ते १२:३० या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जयंती 'बालदिन' म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त मुलांना शिक्षणाच्या चार भिंतीपासून वेगळ्या, स्वच्छंदी वातावरणात मुक्तानंद आनंद घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

     " बालदिन" कार्यक्रमानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी खालील विधाने उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.

*पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व त्यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.

*विद्यार्थ्यांना शाळेतील छोटी विद्यार्थिनी कु. शिवन्या संत आणि शिक्षकांनी मनोरंजक गोष्टी सांगितल्या.
*विविध मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले. त्यामध्ये बास्केटमध्ये बॉल टाकने, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, कोलटउड्या, डोळे बांधून जोकरचे नाक रंगवणे, व प्रत्यक्ष मैदानी खेळ घेण्यात आले.
*काहीविद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा करून बाल दिनात चैतन्य निर्माण केले.
*विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खेळणी आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
*मुलांना गार्डन मधील वेगवेगळ्या  खेळण्यावर प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभव देण्यात आला.
*वैयक्तिक/सामूहिक नृत्याचा आनंद या निमित्ताने विद्यार्थ्यांनी घेतला.

बाल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमात चिमुकले विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्साहाने  सहभागी झाले होते. शिक्षणाच्या ओझ्यातून एक दिवस दूर ही संकल्पना "बालदिनी " राबवल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर त्याचे स्पष्ट भाव दिसून येत होते.
      या कार्यक्रमासंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांकडून/परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
        कार्यक्रमाचे संयोजन: नारायण हट शिक्षण संस्थेचे सचिव: प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे अध्यक्ष: संदीप बेंडुरे, अंकुशराव गोरडे,डॉ. वसंतराव गावडे, डॉ. सुयोगकुमार तारळकर, शिवराम काळे, रोहिदास गैंद, मनोज पवार, डॉ. शरद कदम , संजय सांगळे, मुकुंद आवटे,उज्वला थिटे, शोभा आरुडे, रोहिणी पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले, मालती माने,प्रतिभा तांबे, मीनल पाटील, सायली संत, सुरेखाताई मुके, श्री प्रवीण भाकड यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शिक्षणातून आनंद प्राप्तीसाठी वेगवेगळे उपक्रम नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये राबविण्यात येतात. हे उपक्रम इतर शाळांना देखील मार्गदर्शक ठरत आहेत.
close