Date: Nov 14, 2022
शिरूर कासार -येथे स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे दहीहंडी उत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .तसेच समर्थनाथ तरुण गणेश मंडळाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा व दिवाळीनिमित्त गड किल्ले तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा सन्मान सोहळा नुकताच शिरूर कासार येथील द्वारका कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील व्यापारी तुकाराममामा काळे होते प्रमुख पाहुणे म्हणून व्यंगचित्रकार दीपक महाले तसेच नगरसेवक अक्षय रणखांब, भाजपा शहराध्यक्ष संदीप गाडेकर,परीक्षक संदेश येवले यांची उपस्थिती होती. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, ग्रंथ ,भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. दीपक महाले यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच 'जीवाला छंद असावा' या कवितेचे सादरीकरण केले. स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श तळेकर, अध्यक्ष बाळूभाऊ माळी, आकाश गायके, रोहित खारोडे, शुभम पावसे, विशाल कुचेरिया, तसेच समर्थनात गणेश मंडळाचे विशाल दगडे, शुभम शेटे, हर्षल गाडेकर, विकास भांडेकर, धर्मराज तळेकर,आतार सर, संतोष पांचाळ, यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन प्रतीक प्रतीक भांडेकर यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते दिनेशदादा गाडेकर यांनी मानले.

