shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राहाता शहराध्यक्षपदी समीर हाजी सलीम तांबोळी यांची नियुक्ती..

शौकतभाई शेख

श्रीरामपूर- राहाता येथील एवन फ्रुट सप्लायर्स चे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते समीर हाजी सलीमभाई तांबोळी यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राहाता शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

सामाजिक कार्याच्या प्रती असलेले त्यांचे योगदान पाहता ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी यांच्या आदेशान्वये श्रीरामपूर येथील ऑर्गनायझेशनच्या जिल्हा कार्यालयात ऑर्गनायझेशनचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान,जिल्हा सचिव इब्राहिम बागवान यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन राहाता शहराध्यक्षपदाची  जबाबदारी सोपविण्यात आली.

यावेळी ऑर्गनायझेशन चे जिल्हा संघटक जाकिरभाई शाह,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार शौकतभाई शेख ,सहसचिव शब्बीरभाई (उर्फ राजूभाई)  कुरेशी,राहाता तालुकाध्यक्ष शौकतभाई तांबोळी,राहाता तालुका सहसचिव सादिक तांबोळी,जावेद जाफर बागवान (म्हाळंगीवाले), इम्रान बागवान, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी नुतन राहाता शहराध्यक्ष समीर हाजी सलिमभाई तांबोळी यांचा ऑर्गनायझेशनच्यावतीने शाल, पुष्पगुच्छ देत सत्कार करुन त्यांच्या पुढील भावी उज्वल कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.त्यांच्या या निवडी बद्दल जिल्हा उपाध्यक्ष इकबाल काकर, कार्याध्यक्ष आरिफभाई कुरेशी, सल्लागार ॲड.हारूनभाई शेख, फाय्याजभाई मुलाणी,उत्तर जिल्हा सचिव शाहिद खान, श्रीरामपूर तालुका सचिव अतिक तांबोळी,यांच्यासह समता फाऊंडेशन चे ॲड.मोहसिन शेख, राहाता येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शाह मुश्ताकअली,ज्येष्ठ पत्रकार अजिजभाई शेख आदिंनी अभिनंदन केले आहे.
close