shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी : खडांबे खुर्द ग्रापंचायतीचे ११ जागेसाठी ७९.४४ टक्के मतदान, उद्या मतमोजणी, सर्वांच्या नजरा निकालाकडे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
सोमवार दिनांक १९ डिसेंबर २०२२

राहुरी : खडांबे खुर्द ग्रापंचायतीचे ११ जागेसाठी ७९.४४ टक्के मतदान, उद्या मतमोजणी, सर्वांच्या नजरा निकालाकडे..!!
राहुरी (खडांबे) : राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२२ ते २०२७ करीता मतदान रविवार तारीख १९ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत ११ सदस्य आणि १ सरपंपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून ७९.४४% मतदान झाले आहे.

 सरपंच पदासाठी ३ उमेदवार तर सदस्य करता २७ उमेदवार रिंगणात उभे होते.
एकूण २७४४ मतदानापैकी २१८० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 
        
        या पंचवार्षिक निवडणुकीत जनसेवा मंडळ,ग्रामविकास मंडळ,वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष अशी चौरंगी लढत पहावयास मिळाली असून सरपंच पदाची जागा ही राखीव होती जनतेतून निवड होती. मागिल वर्षी देखील खडांबे खुर्द ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड जनतेतून केली होती. लोकनियुक्त सरपंच पदाची निवड करण्याची खडांबे खुर्द ची ही सलग दुसरी वेळ आहे. 

    सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील आपले कायमचे संबंध आबादीत ठेवत गावची परंपरा कायम राखत कोणताही अनुचित प्रकार न होऊ देता कुठलाही वादविवाद न करता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडली असून गावच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे आता उत्सुकता ही उद्याच्या निकालाकडे लागलेली आहे.
      मंगळवार ता. १९ रोजी दुपारी १२ ते १२:३० या वेळेत फेरी क्रमांक ०५ मध्ये खडांबे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची घोषणा होणार असून संपूर्ण पंचक्रोशीसह तालुक्याचे लक्ष उद्याच्या निकालाकडे लागलेली आहे.
 राहुरी तालुक्याचे तहसीलदार शेख आणि प्रशासकीय पथकाने उद्या होणाऱ्या मतमोजणीचे नियोजन केले आहे.

"सर्व निवडणूक उमेदवार/प्रतिनिधी यांनी नमूद ग्रामपंचायत मतमोजणी फेरीचे वेळापूर्वीच अगोदर एक तास उपस्थित राहावे. ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी फेरीमध्ये दिलेल्या वेळात पुढील फेरीत बदल झाल्यास किंवा वेळ वाढविल्यास नमूद वेळामध्ये कमी जास्त होऊ शकते.
 ज्या ग्रामपंचायतची मतमोजणी चालू आहे तेच उमेदवार मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहतील अशा सूचना तहसीलदार शेख यांनी केल्या आहेत."


खडांबे खुर्द ग्रामपंचायत मतदान प्रभागनिहाय आकडेवारी खालील प्रमाणे......

 प्रभाग क्रमांक -१ मध्ये ७४१ पैकी पुरुष ३३१ स्त्री २७४,
प्रभाग क्रमांक -२ मध्ये ७०० पैकी पुरुष २९५ स्त्री २६०,
प्रभाग क्रमांक -३ मध्ये ४६२ पैकी पुरुष १९४ स्त्री १७२,
प्रभाग क्रमांक -४ मध्ये ८४१ पैकी पुरुष ३५२ स्त्री ३०२ 

असे एकूण २७४४ मतदानापैकी २१८० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. असुन ७९.४४% मतदान झाले आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतमोजणी तक्ता 
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close