इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचतीचे सरपंच होणार आज निश्चित.
ग्रामपंचायत निवडणुकीत गाव पातळीमध्ये विविध पक्षातील मातब्बर पदाधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला... कोण आपल्या गावात आपले वर्चस्व सिद्ध करतोय याकडे जनतेचे लक्ष.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचतींच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी रविवारी अतिशय चुरशीने मतदान झाले असून या गावपातळीवरील मतदानात तालुक्यात सरासरी ८३.७१ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत विविध पक्षातील मातब्बर पदाधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कोण आपल्या गावामध्ये आपले वर्चस्व सिद्ध करतोय. याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेले दिसून येत आहे. त्याचे चित्र मतमोजणीतून दिसून येईल.
एकूण ५७७६० मतदारापैकी ४८३५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
इंदापूर तालुक्यात २६ ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी ७१ व या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २४६ सदस्या पैकी बिनविरोध झालेले ३३ जागा वगळता २१३ जागांसाठी ४७२ उमेदवारांचे मतदानरुपी भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंदीस्त झाले आहे.ते भविष्य आज मंगळवार (ता.२०) रोजी उघडणार आहे.सकाळी १० वाजले पासून मतमोजणी सुरू होणार आहे.तर सर्व ग्रामपंचायत निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होतील.

