श्रीरामपूर:- येथील खासदार गोविंदराव आदीक सभागृहात,शनिवारी सकाळी १०वा,हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वर्ल्ड कॉन्स्टीट्युशन अॅंड पार्लमेंट असोसिएशन (डब्ल्युसिपिए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे *अध्यक्ष डॉ, ग्लानी मार्टीन (युएसए) यांचे हस्ते माधुरीताई उदावंत यांना सन्मानचिन्ह व पुरस्कार देण्यात आला*,
महाराष्ट्रातील सोनार समाजाच्या अनेक नामवंत संघटनेत त्या महत्त्वाच्या पदांवर सक्रिय समाजसेवेचं काम करतात, तसेच मानवाधिकार व मानव विकास संरक्षण समितीच्या ही पदाधिकारी म्हणून त्या समाज सेवेत कार्यरत आहेत त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात त्यांचे सामाजिक काम हे उल्लेखनीय आहे, या सामाजिक कामाची दखल म्हणून माधुरीताई उदावंत यांना पार्लमेंट इंटरनॅशनल अवार्ड २०२२ प्रदान करण्यात आला,
महाराष्ट्रातील ३३पुरुष व १६ महिलांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता,
यावेळी *मी मराठी न्युज चॅनलचे उपसंपादक श्री लुनेश्वर भालेराव( पुणे)व* *प्रसिद्ध उद्योजक श्री नितीन शिंदे (बदलापूर इस्ट ठाणे)* यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे
समाजसेवक, नामवंत साहित्यिक, लेखक, डॉक्टर, व उद्योजक यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
समाजीक कार्यात व मानवी जीवन मुल्य जोपासण्यासाठी या मान्यवरांनी विशेष योगदान दिले आहे, म्हणून त्यांना हा वर्ल्ड इंटरनॅशनल संविधान सांसद अवार्ड प्रदान करण्यात आला आहे,माधुरीताई उदावंत ह्या महाराष्ट्रातील नामवंत समाजसेविका आहेत व त्यांना या जागतिक संविधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले म्हणून महाराष्ट्र राज्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या,यांच्या काढून
श्री भाऊसाहेब शिंदे
हेड जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य,
श्री गोरखआण्णा बाबुराव वलटे
अध्यक्ष :- माझं गाव माझा अभिमान दहीगाव बोलका परिवार,
श्री गोकुळ प्रसाद
अध्यक्ष मानव विकास संरक्षण समिती चाळीसगाव*
दिपक काळे अमरावती
मिंलीद आहेर अमरावती

