शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :
जि.प.केंद्रशाळा देशशिरवाडे येथे 3 डिसेंबर दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.संगिता रायते यांनी स्वीकारले.
शाळेतील शिक्षक श्री.अनिल काकुस्ते ,श्रीमती उज्वला सोनवणे,श्री. महेंद्र महाले, तसेच पालक, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते. विद्यार्थ्यांची भाषणे झाली. श्री.अनिल काकुस्ते यांनी जागतिक दिव्यांग दिवसानिमित्त दिव्यांगांंचे विविध प्रकार, त्यांच्या शिक्षणविषयक समस्या,त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन,एकात्मिक शिक्षणातील फायदे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
उज्वला सोनवणे यांंनी दिव्यांग दिनाविषयी सखोल माहिती समजावून देतांना केंद्रस्तरावर विशेष शिक्षकांंची नियुक्तीचे फायदे सांगितले. तसेच श्रीमती. संगिता रायते यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांगांंचे योगदान विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती. उज्वला सोनवणे यांनी केले.

