shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिवाळी अधिवेशनात आम आदमी पक्षाच्यावतीने आयोजित "महामोर्चा" मध्ये खेड तालुक्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा प्रमाणा वर सहभाग!


नागपूर येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात आम आदमी पक्षाच्यावतीने आयोजित "महामोर्चा" मध्ये खेड तालुक्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा प्रमाणा वर सहभाग!-सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला!
      
नागपूर:- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा, बेरोजगार, महागाई, भ्रष्टाचार, यासह सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी शुक्रवार दिनांक २३/१२/२०२२ रोजी सकाळी ११:०० ते ४:०० या वेळेत नागपूर येथे विधानसभेवर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन मोर्चाला विराट स्वरूप प्राप्त झाले होते.

या मोर्चामध्ये सहभागी होऊन विधिमंडळावर धडक मारण्यासाठी व तालुक्यातील प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी खेड तालुका आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या महामोर्चा मध्ये सहभाग घेतला. पुणे जिल्ह्यातीलखेड तालुक्यातून आम आदमी पक्षाचे असंख्य कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

तालुक्यातील विविध प्रश्न त्यामध्ये शेतकऱ्यांचा पिक विमा , शेतीला हमीभाव, बेरोजगारीचा प्रश्न, स्थानिकांना रोजगाराचा प्रश्न, गायरान अतिक्रमित लोकांचे प्रश्न, खेड सेझ पंधरा टक्के परतावा प्रश्न, चासकमान भामाआसखेड अंतर्गत टाकलेले शेतीवरील शिक्के काढणेसंदर्भातील प्रश्न व इतर सर्वसामान्यांचे प्रश्न या मोर्चामध्ये खेड तालुका आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींनी मांडले.

मोर्चामध्ये खेड तालुका आम आदमी पक्षाचे मा.शाह आलम बेग, साजिद मुलानी, संदीप पाटील, निर्मल साबळे,, नितीन सैंद, पंढरीनाथ जरे, दत्ता ढेरंगे,विशाल दुर्गाडे, अनुज पांडे, भूषण शिंदे, रोहित शिंदे, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते महामोर्चात सहभागी झाले होते.

नागपूर विधिमंडळअधिवेशनात महामोर्चात विधानसभेवर धडकल्यानंतर खेड तालुक्यातील आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून यापुढे तालुक्यातील विविध सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर  लढाऊ उभा करुन न्याय मिळवण्यासाठी संयुक्त प्रयत्न करून तालुक्यात आम आदमी पक्षाची ताकद वाढून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. असे कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे.
close