बदलत्या परिस्थितीचा विचार करत असताना प्रामुख्याने वडार समाजात जाणवणार्या काही बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. समाज ग्रामीण भागात जसा विखुरलेला आहे तसाच शहरी आणि निमशहरी भागातही स्थलांतरित होऊन स्थिरावला आहे. समाज मनावर बदलत्या राजकीय, आर्थिक, शैक्षणिक परिवर्तनाबरोबरच वैज्ञाम्पलानिक आणि बुद्धीप्रामाण्यवादाचाही परिणाम झाला आहे. असे असले तरीही या सर्व बदलांचे प्रमाण वडार समाजात अत्यल्प असेच आहे. शहरी व ग्रामीण भागात वडार समाज विखुरलेला असल्याने इतर समाजातील बदलत्या परिस्थितीचा परिणाम त्याचे दैनंदिन जीवन व राहाणीमानावर झालेला असला तरी हजारो वर्षांपासून रूढी़ परंपरा़ अंधश्रध्दा, व्यसनाधिनता व स्वैरवर्तन याच्या प्रभावाने युक्त असल्याने वडार समाज व्दिधा अवस्थेत आहे. अज्ञाम्पलाऩ बेरोजगारी़ संशयीवृत्ती याने हताश झाला आहे. जोडीला अनेक वेळा समाज धुरींणाकडून झालेल्या अपेक्षा भंगाने पुरता दुभंगलेला आहे. ठाई ठाई लाळ घोटेपणा करणारी पिलावळ आणि लांडग्यासारखी वृत्ती असलेली अन् स्वार्थी संधीचे सोने करण्यासाठी टपलेली श्वापदे यामुळे समाजातील भल्याभल्यांनाही कळेना झाले आहे की विश्वास कोणावर आणि कसा ठेवावा त्यामुळे समाज एकमेकांपासून काही अंतर ठेवून पण तसे न दाखवता देखल्या देवा
दंडवत करून वाटचाल करतो आहे.
समाजात प्रगतीचे वारे वाहावेत म्हणून सर्वच बांधव आशाळभूत होऊन प्रगतीच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत़ मात्र त्यांच्या पदरात निराशे व्यतिरिक्त काहीच पडले नाही याचे मुख्य कारण समाजास लाभलेल्या नियोजन शून्य अदूरदृष्टीच्या नेतृत्वाबरोबरच केवळ राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या छोट्या-मोठ्या संघटना. या संघटनांचा उगम जरी चांगल्या हेतूने प्रेरीत होऊन झाला असला तरी त्यांच्यात बाह्य राजकारणाच्या प्रभावाने आकाशाला हात लावण्याची महत्वाकांक्षा लवकर जागी होते अन् उदात्त हेतू मागे पडून स्वार्थी हेतू प्रबळ होऊन स्वतःला खूप मोठ्या नेत्याच्या ठिकाणी पाहाण्याची दिवास्वप्ने त्यांची स्वतःची झोप नाहीशी करतातच पण त्यांनी समाजाचीही झोप उडवून टाकली आहे. अशा परिस्थितीने समाजातील सामान्य माणूस पुरता भांबावून गेला आहे. पहाट होईल म्हणून उठलेल्या बांधवांच्यासमोर काळरात्र गडद होतानाच दिसू लागल्याचे पाहून पुरता गलितगात्र होऊन गेला आहे. आपल्याच नशिबाला दोष देण्यापेक्षा त्यांच्या हातात काहीच उरलेले नाही. सामान्य माणसाला काय हवे याचा विचार करण्याची मानसिकता उरलेली नाही. जो तो आपली पोळी कशी भाजेल याची चिंता करतो. संघटना आणि नेते समाजाचे भले चिंतणारे आपल्याशिवाय दुसरे कोणीही नाही असे बेमालुमपणे दाखवतात आणि त्यांचे भाट त्यांना दैवत मानून उदो उदो करीत राहतात.
परिणामी समाजात प्रगती होण्याऐवजी खेळखंडोबाच अधिक झाला आहे. समाज नव्या जिद्दीने़ नव्या जोमाने उभे राहायचा प्रयत्न करीत असतानाच अशा लांडग्यांच्या हातात पडून कोकरासारखी अवस्था होऊन कोलमडून पडतो. आणखी काही वर्षे पुन्हा उभे न राहाण्यासाठी. राजकीय महत्वाकांक्षेपोटी भरकटलेल्यामनोवृत्तीने समाजाला सतत खेळवत ठेवलेआहे. समाजाबरोबर उंदरामांजरासारखा खेळमांडला आहे. कोणाला समाजाचे आंबेडकरव्हायचे आहे तर कोणाला समाजाचे निरंकुषनेते व्हायचे आहे. नेत्याला जे वाटते ते त्यांच्या अनुयांनाही वाटते. त्यामुळे सारेच नेतृत्वाच्या मॅरेथॉनमध्ये धावताहेत. समाज हताशपणे त्यांची जीवघेणी दौड पहात आहे. नेते धावताधावता समाजालावेगवेगळी आश्वासने देत आहेत. कोण म्हणतोमी हे मिळवून देतो़. कोण म्हणतो मी तेमिळवून देतो़ कोण म्हणतो हे मिळालेच पाहिजे तर कोण हक्काची भाषा करतो आणि समाज याभूलथापा ऐकून ऐकून त्रासून गेला आहे. तरूण वर्ग असंतोषाने खदखदतो आहे. अशा विचित्र कैचीत सापडलेला वडार समाज आता स्वतःच आपली वाट शोधू लागला आहे समाजाने अनेकवेळा लांडगा आला रे आला अशी परिस्थिती अनुभवली आहे त्यामुळे समाजाचा कोणावरही विश्वास राहिलेला नाही. उभरती पिढी पुरती नाराज असून त्यातून मार्ग काढण्यासाठी नि:स्वार्थी भावनेने समाजाची
सेवा करू शकेल आणि सर्वांना एकत्रित घेऊन जाऊ शकेल अशा दूरदृष्टीच्या नेतृत्वाच्या शोधात आहे. अशावेळी तरूण पिढीला योग्य मार्गदर्शनाची जशी जरूर आहे तशीच भविष्याचा वेध घेऊन समाजात वैचारिक क्रांती घडवू शकेल अशा विचारी नेतृत्वाची गरज आहे. आजमितीला संघटना आणि नेते समाज आपल्याच पाठीमागे आहे. आपण सांगू त्याप्रमाणे आपल्या तालावर डोलेल असे गृहीत धरून ज्या त्या संघटना आणि जो तो नेता काम करीत आहे. तरूण पिढी़ तळागाळातील गरीब़ द्रारिद्रयाने पिचलेला़ कालबाहय रूढीपंरपंरा यात अडकून पडलेल्या समाजाकडे पहायला कोणालाच वेळ नाही सुशिक्षित़ नोकरदार यांनाही समाजात मिसळून त्यांना मार्गदर्शन करण्याची इच्छा नाही. सुस्थितीत असलेल्या वर्गाने गरीब आणि मध्यमवर्गीयाकडे एखादा नोकरीवाला किंवा उच्च शिक्षित मुलगा-मुलगी पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पहायचेच नाही इतकी भयंकर मानसिकता बनवली आहे. त्यामुळे समाजात गरीब़ तळागाळातला विरूद्ध मध्यमवर्गीय श्रीमंत व नोकरदार यांच्यात एक अदृश्य भिंत निर्माण झाली आहे. सामान्य तळागाळातला समाज पोटापाण्याच्या विवंचनेत चोवीस तास गुंतून पडलेला आहे. त्यांना आपल्या मुलांच्याकडे पाहण्यास फुरसत नाही. गावोगावी शाळा आहेत. शिक्षणाचे महत्व त्यांना कळले आहेत पण परिस्थितीच्या रेट्यापुढे मुलांच्याकडेे वेळ देणे शक्य होत नाही याची खंतही त्यांना आहे परंतु त्यांचा निरूपाय आहे. अशा परिस्थितीत सुुरूवातीला शिक्षणाचा पाया कच्चा राहिल्यावर सामान्य आणि गरीबा घरची मुले कशी टिकाव धरू शकणार त्यामुळे समाजातील अनेक मुलांचे आयुष्य मातीमोल झाले आहेच. (क्रमशः)
-वसंत शिंदे, सचिव
स्वाभिमानी वडार समाज संघटना

