shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खेळामुळे आपले शरीर व मन सुदृढ निरोगी राहते - सचिव धनंजय रणवरे.

खेळामुळे आपले शरीर व मन सुदृढ निरोगी राहते - सचिव धनंजय रणवरे.

निमसाखर येथे एन.ई .एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शालाअंतर्गत क्रीडा सप्ताह अत्यंत उत्साहवर्धक व आनंदी वातावरणात पडला पार.

इंदापूर प्रतिनिधी: एन.ई .एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा शालाअंतर्गत क्रीडा सप्ताह अत्यंत उत्साहवर्धक व आनंदी वातावरणात पार पडला.
 इयत्ता पाचवी ते बारावी मधील अनेक विद्यार्थ्यांनी क्रीडा सप्ताहामध्ये सहभाग नोंदविला होता. यामध्ये कबड्डी ,खो-खो ,गोळा फेक, स्टॅंडिंग जंप, संगीत खुर्ची, फुगे फोडणे, थांबणे अशा विविध खेळांचा समावेश होता. या शालांतर्गत क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे विद्यमान सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे, यशवंत विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, ग्रामस्थ विश्वनाथ दळवी उपस्थित होते.
 यावेळी संस्था सचिव धनंजय रणवरे म्हणाले की, आयुष्यामध्ये खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वच मुला मुलींनी कोणत्या ना कोणत्या तरी खेळामध्ये सहभाग घेतला पाहिजे. किंबहुना खेळाचे तंत्र कौशल्य आत्मसात केले पाहिजे. निरोगी शरीर हीच आजची खरी संपत्ती आहे. खेळामुळे आपले शरीर व मन सुदृढ निरोगी राहते. म्हणून खूप खेळा सराव करा व विद्यालयाचा नावलौकिक मिळवण्याचा प्रयत्न करा असा मौलौकिक संदेश देऊन  सर्व खेळाडू शिक्षक मार्गदर्शक यांना शुभेच्छा दिल्या.
 विद्यालयाचे क्रीडाप्रेमी प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांनी सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना खेळाचे नियम अटी माहिती सांगितल्या .सर्व खेळाडूंना भरघोस शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी क्रीडा सप्ताहासाठी सर्वोत्तर सहकार्य करून सर्व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले .प्रमोद चव्हाण, वैभव हनुमंते, सिकंदर मुलांणि या क्रीडा शिक्षकांनी या सप्ताहाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल त्यांचेही प्राचार्य यांनी खूप कौतुक केले. पर्यवेक्षक मधुकर खरात, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे यांनी सर्व खेळाडू मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या
close