shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने बाळासाहेब व्यवहारे यांचा केला सत्कार.

धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने बाळासाहेब व्यवहारे यांचा केला सत्कार.

माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच पदी सौ. मंगल व्यवहारे यांच्या निवड.
इंदापूर प्रतिनिधी: बाब्रस मळा येथे धर्मवीर संभाजी मित्र मंडळ यांच्या वतीने माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच सौ. मंगल बाळासाहेब व्यवहारे यांची निवड झाल्याबद्दल बाळासाहेब व्यवहारे यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
 यावेळी माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, ज्येष्ठ नेते एकनाथ गार्डी, पोपटराव जगताप ,माजी नगरसेवक व विश्वस्त श्रीधर बाब्रस ,माजी नगरसेवक सुरेश गवळी, माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले ,माजी नगरसेवक विनायक बाब्रस तथा अध्यक्ष माजी नगरसेवक हरिदास हराळे ,युवा नेते निखिलसेठ बाब्रस, अशोक हराळे, स्वप्निल मखरे, राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक अध्यक्ष अहमदराजा सय्यद, बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ज्ञानेश्वर चौगुले, सुभाष खरे सर, बाळासाहेब म्हेत्रे, रमेश बनसोडे, अजित शेंडगे, गणपत गवळी, दुर्योधन ठवरे, मनोज भापकर, दत्तू शिंदे ,बापू भिसे ,समीर दुधनकर, गणेश गोरे, अनिल चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब व्यवहारे म्हणाले की,   माझी पक्षाशी असलेली ४० वर्षाची निष्ठा पाहून माझ्या पत्नीला सरपंच पदाची उमेदवारी देत जो विश्वास टाकला  आणि त्या विश्वासाला पात्र ठरत मतदार कार्यकर्त्यांनी कुठलेही फसवणूक न करता आत्तापर्यंत  विरोधकांच्या कुठल्याच आमिषाला बळी न पडता मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. त्यामुळेच हा विजय झाला. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर , मधुकर भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा परिषदचे माजी सभापती प्रवीण माने, युवा नेते दीपक जाधव यांच्या  इतर पदाधिकारी यांच्या सहकार्याने तसेच ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या परिसरात केलेल्या कामाच्या पोचपावतीमुळे व पक्षामुळेच जिंकता आली. या निवडणुकीत ज्यांनी मदत केली
 मतदान केले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
close