शिर्डी प्रतिनिधी - (संजय महाजन) :-
विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी.एस प्राथमिक विद्यालय लोणावळा शाळेत शैक्षणिक वर्ष२०२२_२३ वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडले . नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. गो. व्यं. शिंगरे व संस्थेचे कार्यवाह मा.डॉ.सतीश गवळी सर यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंगल जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या मनोगतात त्यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी नव-नवीन रंगीत कपडे घालून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशभक्ती पर व विविध सांस्कृतिक गाण्यावर नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. अरविंदभाई मेहता (शालासमिती अध्यक्ष व्ही.पी. एस.प्राथमिक, विद्यालय)यांनी भुषवले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विजयजी कुकरेजा साहेब (सेक्रेटरी) स्वामी रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्ट वरसोली उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री मा. अरुणा इराणी यादेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या होत्या. मा. श्री. राजेशजी गुप्ता साहेब खजिनदार स्वामी रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्ट वरसोली आणि मा. श्री. अवतार कोहली(फिल्म डायरेक्टर) आणि सदस्य स्वामी रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्ट वरसोली हे प्रमुख पाहुणे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मा. डॉ. धीरूभाई कल्याणजी शालासमिती सदस्य(व्ही.पी.एस प्राथमिक विद्यालय), मा.श्री. गिरीषजी पारख साहेब शालासमिती सदस्य(व्ही. पी. एस. प्राथमिक विद्यालय) मा.श्री. कन्हैयाजी भुरट इंग्लिश मीडियम शालासमिती अध्यक्ष, मा. श्री. राजू खांडेभरड माझी पालक आणि माजी सरपंच वरसोली हे उपस्थित होते.
संस्कृतिक कार्यक्रम साठी शिक्षक श्री. संजय भालचिम, श्री. प्रकाश पाटील, श्री. हनुमंत शिंदे, श्री महादेव शिरसाट,श्री.बापूराव भोसले, श्री .अमित रसाळ, शिक्षिका सौ. मनिषा जरग, सौ. सुनिता वरे, सौ. आशा खामकर, सौ. संगिता पाटील, श्रीमती स्वप्नाराणी भालेराव या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री भिवाजी गायखे आणि श्रीमती जयश्री बागलकोटे यांनी विशेष मेहनत घेतली.
श्रीम. स्वप्नाराणी भालेराव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री.प्रकाश पाटील यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन केले. सौ. सुनिता वरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर श्री.हनुमंत शिंदे यांनी आभार मानले.

