shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खंडाळा ग्रामपंचायत विजयी उमेदवारांचात्रिदल सैनिक सेवा संघाच्यावतीने सत्कार..!

शौकत भाई शेख
श्रीरामपूर-

तालुक्यातील खंडाळा गावातील  नुकत्याच ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेले माजी सैनिक महेश ढोकचौळे यांच्या सुविद्य पत्नी मंजुषाताई ढोकचौळे व माजी सैनिक अशोक (आबा) पवार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लढत देऊन गावाचा विकास कसा होईल या दृष्टीने या अगोदरही ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात निपक्षपाती पणाने चांगले कार्य करून गावाचा विकास केला आहे.

त्या अनुषंगाने गावकऱ्यांचा माजी सैनिकांवर १०० % भरोसा असल्याकारणाने पुन्हा एकदा ग्राम विकास मंडळ या पॅनलचा ९ सदस्यांनी विजय खेचून आणला, खऱ्या अर्थाने हा विजय गावच्या मतदार राज्यांचाच आहे ,त्या अनुषंगाने माजी सैनिकांच्या त्रिदल सैनिक सेवा संघ शाखा श्रीरामपूर च्या वतीने माजी सैनिक महेश ढोकचौळे यांच्या राहत्या घरी यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्रिदल सैनिक सेवा संघाचे चे अहमदनगर उत्तर चे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार, माजी नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे, तालुकाध्यक्ष  संग्रामजीत यादव,माजी सैनिक महेश ढोकचौळे, बाळासाहेब बनकर,अमित देशमुख, सुनील भालेराव, संजय बनकर, जमीर शेख ,विलास खर्डे ,छायाताई मोटे, सोमनाथ ताके, डांगे मेजर ,सुवर्णा ताके, रवींद्र कुलकर्णी, राधाकिसन बोरकर, नवनाथ ढोकचौळे, आप्पासाहेब सदाफळ, ताराचंद अलगुंडे,संदीप विघावे,अशोक पवार ,प्रभाकर साबदे ,अंकुश ढोकचौळे, सोनाली विघावे, लहानबाई रजपूत ,भारती वाघमारे ,अनिता मोरे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close