shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रज्ञाशिल पवार उच्च शिक्षणासाठी कॅनडाला जाणार असलेबाबत सत्काराचे आयोजन..!

शौकतभाई शेख
श्रीरामपूर-  विश्व शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आयु, शिवाजी संभू पवार (पी.एस.आय. आश्वी पोलीस स्टेशन)  यांचे चिरंजीव  व मेजर कृष्णा सरदार यांचे भाचे आयु,प्रज्ञाशिल शिवाजी पवार यांची एम.एस (मास्टर ऑफ सायन्स ) सप्लाय चेन मॅनेजमेंट या उच्च शिक्षणासाठी कॅनडा येथील प्रसिद्ध असलेल्या कॉलेज ऑफ कॉनेस टोगा या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी २ वर्षासाठी जाणार असुन दिनांक ९ जानेवारी २०२३ पासून कॉलेज सुरू होणार असल्याने दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल १ येथून पोलीश एअर लाईन्स ने रवाना होणार आहे.

या अनुषंगाने अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता लुंबीनी बुध्द विहार श्रीरामपूर (रेल्वे स्टेशन जवळ) त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे,या निमित्ताने  पवार परिवाराच्या वतीने खिरदान कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे, तरी सर्व उपासक व उपासिकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे असे मेजर कृष्णा सरदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
close