पडस्थळ गावच्या नवनिर्वाचित महिला सदस्याकडून तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा सत्कार.
तालुक्यातील सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याबद्दल केला सत्कार
पडस्थळ ग्रामपंचायतीवर महिलाराज.. सर्व जागेवर महिला उमेदवार आल्या निवडून.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या मतदानाचा निकाल दि.२० डिसेंबर २०२२ रोजी लागला. या निवडणुकीमध्ये श्री कोटलींनाथ ग्रामविकास पॅनल पडस्थळ यामधील निवडून आलेल्या सरपंच वैशाली मारकड व सदस्य सपना बोंगाणे, विद्या बोंगाणे, बेगम झेंडे, प्रियांका गव्हाणे,अश्विनी कोळेकर, रेश्माताई रेडके या महिला सदस्यांनी इंदापूर तालुक्यातील सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी तथा इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे सत्कार करून आभार मानले.
यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे महेंद्र रेडके उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना रेश्माताई रेडके म्हणाल्या की, इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या महिला सदस्यांना सन्मानाने काम करता येत आहे. गावच्या विकासासाठी व नवीन योजनांची माहिती व्हावी यासाठी आम्ही पडस्थळ गावच्या सर्व नवनिर्वाचित महिला सदस्या प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहे. त्यांनी आम्हाला विकास कामाबद्दलची सर्व माहिती समजावून सांगितली व गावच्या सर्वांगीण विकासासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या.
आभार प्रदर्शन सुलन झेंडे यांनी मानले. यावेळी नवनिर्वाचित महिला सदस्या बरोबरच सुरवंता रेडके, रुपाली राऊत, शितल कोळेकर, इंदुबाई झेंडे, अश्विनी रेडके इत्यादी महिला उपस्थित होत्या.
चौकट:
पडस्थळ ग्रामपंचायतीवर महिलाराज
पडस्थळ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पडस्थळ गावातील मतदारांनी सात जागांवर सात महिला सदस्य व सरपंच महिला असे एकूण आठ महिला पडस्थळ ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्या. त्यामुळे पडस्थळ ग्रामपंचायतीवर महिला राज प्रस्थापित झाले आहे. यामध्ये कोटलिंगनाथ ग्रामविकास पॅनलच्या सरपंच वैशाली मारकड व सदस्य सपना बोंगाणे, विद्या बोंगाणे, बेगम झेंडे, प्रियांका गव्हाणे,अश्विनी कोळेकर, रेश्माताई रेडके या महिला निवडून आल्या तर कोटलिंगनाथ जनसेवा पॅनलच्या सदस्य पदी रोहिणी प्रमोद काळे या निवडून आल्या.
एकूणच सर्व महिला उमेदवार निवडून आल्यामुळे मतदारांचेही विशेष कौतुक विविध स्तरातून होत असल्याचे दिसून येत आहे.

