shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात मन रमवा - प्रकाश पा. निकम

शौकतभाई शेख

श्रीरामपूर - सेवेत असताना जीवन चाकोरीबद्ध असते त्यामुळे इतर बाबींकडे वेळ मिळत नाही .मात्र सेवानिवृत्तीनंतर मोकळा वेळ मिळतो.या वेळेचा सदुपयोग करावा,आपण समाजाचे देणे लागतो हे सामाजिक ऋण फेडण्यासाठी निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात मन रमवावे त्यातून मिळणारा आनंद आयुष्यभर आनंद देईल असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे बांधकाम विभाग कमिटी चेअरमन प्रकाश पा.निकम यांनी केले.

 येथील डी. डी.काचोळे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पुंडलिक नरवाडे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले यावेळी त्यांच्या सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमात प्रकाश निकम मार्गदर्शन करत होते.
अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था मॅनेजिंग कौन्सिल सदस्या व श्रीरामपूर रयत संकुल चेअरमन मीनाताई जगधने होत्या,

प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी अनिल पवार,प्राचार्य मुकुंद पोंधे, मेडिकल ऑफिसर डॉ.रवींद्र जगधने,प्राचार्य डॉ .पी. व्ही. बडधे,प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर,मुख्याध्यापिका सोनाली पैठणे,दिलीप नाईक, विठ्ठल बोरुडे, शशिकांत दहिफळे,सुभाष बोर्डे,आदिनाथ थोरात,पर्यवेक्षक सौ.लोखंडे पर्यवेक्षक बी.यु. रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्तविक व स्वागत मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी केले,त्यानंतर प्रांताधिकारी अनिल पवार यांचे हस्ते सत्कारमूर्ती पुंडलिक नरवाडे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर सौ.संगीता नरवाडे यांना सौ. निंबाळकर यांचे हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विद्यालयाच्यावतीने श्री. नरवाडे यांना भेटवस्तू देण्यात आली. प्राचार्य मुकुंद पोंधे,डॉ.रवींद्र जगधने ,दत्तात्रय खैरे,श्री. नाईक, आजी - माजी विद्यार्थ्यांनी श्री. नरवाडे यांचे शैक्षणिक कार्याचा गौरव केला.

सत्काराला उत्तर देताना पुंडलिक नरवाडे यांनी सर्व नातेवाईक, कुटुंब,मित्रपरिवार,गुरू,रयत सेवक,विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नोकरी निमित्त ज्यांचा संबंध आला अशा सर्वांना धन्यवाद देत कृतज्ञता भाव व्यक्त केला.
यावेळी मंथन परीक्षेत राज्यात विशेष गुणवत्ता संपादन केल्यामुळे सिद्धेश गोरणे व प्रा .गोराणे यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन रवी निकम यांनी केले,सुत्रसंचलन संगीता उगले तर आभार सौ. घावटे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
close