shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कामगार प्रभासच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार आरोपीस तात्काळ शोधून अटक करावी- इस्त्याक शेख


बालकामगारांचे शोषण केले जात असलेबाबत हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येक गिरणी आणि दाल कंपन्यांची सखोल चौकशी करुन उचित कार्यवाही करावी - श्रमजीवी पत्रकार संघाची मागणी
हिंगणघाट ।  प्रतिनिधी:-
कामगार प्रभास याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार आरोपीस तात्काळ शोधून अटक करावी तसेच बालकामगारांचे शोषण केले जात असलेबाबत हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येक गिरणी आणि दाल कंपन्यांची तहसिलदार कार्यालयामार्बत  सखोल चौकशी करुन उचित योग्य कार्यवाही करावी असे आशयाचे निवेदन प्रांतअधिकारी हिंगणघाट यांना देऊन श्रमजीवी पत्रकार संघाचे अध्यक्ष इस्त्याक शेख यांनी शासनाकडे मागणी केली आहे.

मागे नुकताच एका गिरणीमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला होता त्यांची वार्ता पोलिसांना न कळवता त्याच्या मृत्यूदेहाची परस्पर अंत्यसंस्कार करुन वाट लावण्यात आली होती. यानंतर त्या कामगाराच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी होत संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी यातील एक प्रमुख आरोपी अद्यापही फरार आहे,
त्यास शोधून तात्काळ अटक करण्यात यावी अशी श्रमजीवी पत्रकार संघाची मागणी आहे.
याकरीता आज दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने हिंगणघाट येथील उपविभागीय (प्रांत)अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

हिंगणघाट तालुक्यात सुरू असलेल्या व झालेल्या प्रत्येक गिरणी व कंपनीची महसूल प्रशासनामार्फत एक समिती गठीत करून सदरील प्रकरणी सखोल चौकशी करावी,तसेच प्रभासच्या मृत्यू प्रकरणातील फरार आरोपीं संचालकस लवकरात लवकर शोधून अटक करावी सोबतच संबंधित प्रकरणी संचालिकाचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

सविस्तर असे की, दि.३० नोव्हेंबर २०२२  रोजी रात्री हिंगणघाट परिसरातील कडजना गावात सुरु असलेल्या मानधनिया दाल मिलमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला होता.आणि कामगार प्रभासच्या मृत्यूची बातमी दडपण्याच्या उद्देशाने मानधनिया दाल मिलचा संचालक आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांना न कळविता दि.१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी हिंगणघाट येथील स्मशानभूमीत प्रभासचा मृतदेहाचे परस्पर अंतिम संस्कार (जाळला) केले होते.मृत कामगार प्रभासच्या नातेवाइकांनी याबाबत हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत मानधनिया दाल मिलच्या संचालिका आणि संचालकसह त्यांच्या सहकाऱ्यांवर कलम ३०४ अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई केली.यामध्ये ३ आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले असून मिलच्या संचालीकेस जामीन  मिळालेला आहे.व संचालक फरार असून पुढील तपास वर्धा पोलीस करत आहेत, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामगार अल्पवयीन असल्याची माहिती आहे.मृत प्रभास हा अल्पवयीन होता की प्रौढ, हा पोलिसांच्या तपासाचा विषय आहे,सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट परिसरात आजही हिंगणघाट क्षेत्रात अनेक गिरण्या, कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांना कामगार म्हणून ठेवले जात आहे.जो पूर्णपणे गुन्हा आहे,हा संपूर्ण प्रकार लक्षात घेऊन हिंगणघाट तालुक्यात सुरू झालेल्या प्रत्येक गिरणी व कंपनीची प्रशासनाने एक स्पेशल समिती गठीत करून सखोल चौकशी करावी जेणेकरून अल्पवयीन मुलांना कामगार होण्यापासून रोखले जाईल आणि अल्पवयीन मुलांना कामगार बनवणाऱ्या ठेकेदारांना तुरुंगात पाठवले जाईल.अशी मागणी घेवून आज दिनांक ३२ डिसेंबर २०२२ रोजी श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.निवेदन घेतल्यानंतर हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकारी मॅडम यांनी कामगार अधिकाऱ्यांशी बोलून चौकशी करण्याचे सांगितले आहे. मानधनिया दाल मिलमधील कामगार प्रभासच्या मृत्यूवरून हे स्पष्ट झाले आहे की,लोकांच्या गरिबीचा फायदा घेऊन काही बडे धनदांडगे अजूनही बाल आणी प्रौढ मुलांना मजूर बनवून त्यांची पिळवणूक करत आहेत, या संपूर्ण प्रकरणावर श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाने याची प्रामुख्याने दखल घेत अल्पवयीन मुलांना मजूर बनविणाऱ्या ठेकेदार आणि धनदांडग्यांचा खरा चेहरा प्रशासनासमोर आणण्याचा संकल्प केला आहे.तसेच प्रभास मृत्यू प्रकरणातील फरार आरोपीं संचालकास लवकरात लवकर अटक करून संचालिकाचा जामीन रद्द करावा, अशी मागणीही वर्धा जिल्हा पोलीस विभागाकडे केली आहे.

वृतसंकलन:शौकतभाई शेख, श्रीरामपूर
close