लेख क्रमांक : १८१
१) एक जानेवारी रोजी ख्रिस्ती नव वर्ष सुरू होते व त्याची सुरुवात २५ डिसेंबरच्या नाताळपासून विविध प्रकारच्या उलट सुलट चर्चेतून रंगत जाते.
२) या सर्व उलट सुलट चर्चेतून जे चांगले आहे ते घ्यावे व वाईट आहे ते सोडावे हा संदेश मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला.
३) नवीन वर्षाचे स्वागत केवळ दारू पिऊन व मोठमोठ्या पार्ट्या आयोजित करून करू नये याबाबत जनजागृती झाली.
४) मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्तीच्या शपथा/ प्रतिज्ञा असे कार्यक्रम पार पडले.
५) अनेक ठिकाणी दारू ऐवजी दूध प्या हा संदेश देण्यासाठी मोफत दूध वाटपाचे नियोजन करण्यात आले होते.
६) जळगावमध्ये आरोग्य रक्षणार्थ दररोज गोमूत्र प्यावे हे सांगण्यासाठी गोमूत्र पार्टी आयोजित करण्यात आली होती.
७) शासनाने अवैध दारूची वाहतूक व दारू पिऊन गाड्या चालवणारे, गोंधळ घालणारे यांचे विरुद्ध कडक मोहीम राबविली. याबरोबरच दारू पिणाऱ्यांना भेसळमुक्त, दर्जेदार दारू मिळावी म्हणून दुकानदारांनादेखील प्रोत्साहन दिले.
८) एकंदरीत नववर्षाच्या प्रारंभी सात्विकतेची जोपासना करणारे अनेक संदेश उपदेश उपक्रम राबविले गेले ही जमेची बाजू आहे. कोणत्याही प्रसंगास गुणदोषांसकट स्वीकारावे अशी रीत आहे. दोष टाकून द्यावे व चांगले ते घेऊन आपली स्वतःची, समाजाची, राष्ट्राची प्रगती करावी ही सकारात्मकता दिसून आली त्याचे कौतुक करायला हवे.
लेखक : देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने,
मो. ९८८१३७३५८५

