कळस भागातील शेतकऱ्यांना छत्रपती साखर कारखान्यात सभासदत्व मिळेल - शरद पवार
माजी आमदार गणपतराव पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनीशेतकऱ्यांशी साधला संवाद
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील कळस भागातील शेतकऱ्यांना,छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर मध्ये हक्काचे सभासद करण्यासाठी,तात्काळ कारखान्याचे चेअरमन तसेच माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे व स्वतः मी,तात्काळ बैठक घेणार असून,कळस भागातील शेतकऱ्यांना कारखान्यात सभासद करून घेण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
कळस ता.इंदापूर येथील दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी रविवार ता.१ जानेवारी रोजी भेट देत परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,यांच्यासह शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशालीताई पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी वालचंदनगर - कळस जिल्हा परिषद गटाच्या वतीने शरद पवार यांचा सन्मान केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की,खडकवासला कॅनॉलच्या अंतर्गत येणारा कळस भाग आहे. पुण्याला पिण्याच्या पाणी या नावाखाली,उजनी धरणातून पाणी देण्यात आले.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार,सुप्रिया सुळे व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत, उजनी धरणातून या भागाला पाणी मिळणारी योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळवली.मात्र काही कारणामुळे या योजनेला खो बसला.ही योजना झाली पाहिजे अशी अपेक्षा प्रतापराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त केली.
छत्रपती सहकारी साखर कारखान्यांला कळस परिसरातील सर्व गावे जोडून,ऊस गाळपाचा प्रश्न निकाली काढावा.तसेच द्राक्ष बागा अच्छादन झाकण्यासाठी,शासनाकडून अनुदानावर शेतकऱ्यांसाठी पेपर मिळावा अशीही मागणी शरद पवारांकडे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केली.
यावेळी कळस गावच्या सरपंच वृषाली पाटील,विठ्ठल पाटील,नारायण हारोळे, दादासाहेब वायाळ,संतोष खारतोडे,गजानन खारतोडे,उपसरपंच विशाल भोसले,सोसायटीचे चेअरमन गजानन खरतोडे,धनंजय गावडे,मुगाजी सागळे,दादा सांगळे,धनजंय सांगळे,सुनिल ओमासे,दिलीप कटके,राजू खरात,संजय दोशी,सचिन सपकळ,शुभम निंबाळकर,अनिकेत भरणे,संग्रामसिंह पाटील,बाळासाहेब करगळ,सुभाष पाटील,हनुमंत कोकाटे,हनुमंत बंडगर,प्रताप चवरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

