shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्षितीज समाचार समुहाच्यावतीने बाभळेश्वर येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न..


अजिजभाई शेख
राहाता- तालुक्यातील बाभळेश्वर येथील‎ क्षितीज समाचार वृत्तपत्र समूहाच्यावतीने‎ दरवर्षी प्रमाणे विशेष कार्यकारी अधिकारी सौ. रेखा गोरखदादा गवारे - पाटील यांच्या‎ संकल्पनेतून मकर संक्रांती निमित्त हळदी-कुंकू व‎ तिळगुळ वाटप कार्यक्रम मंगळवारी (दि.१७) मोठ्या‎ उत्साहात संपन्न झाला. हितगुज करुया मिळुन‎ साऱ्याजणी,हळदी कुंकू लेऊया हक्काच्या अंगणी या‎ उक्तीप्रमाणे स्त्रियांनी एकत्र रहावे, हा संदेश‎ या कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यात आला. यावेळी लिटील हार्ट प्री स्कूलच्या प्राचार्य सौ. शुभांगी दीपक म्हसे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी‎ सौ.रेखा गवारे यांनी‎ महिलांना संक्रांतीचा वाण, तिळगुळ तसेच भेटवस्तू‎ देऊन सन्मान केला. या कार्यक्रमासाठी गावातील‎ महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुवर्णा अमृत मोकाशी यांनी केले तर सौ. रेखा गवारे यांनी आभार मानले.

यावेळी शुभांगी म्हसे,सुवर्णा मोकाशी,मनीषा आहेर, सुनिता म्हस्के, शितल म्हस्के, डॉ. वैशाली म्हस्के, सुरेखा म्हस्के, कोमल कदम,माधुरी कदम,अश्विनी बेंद्रे कविता म्हस्के आदि उपस्थित होते.
*छाया : पप्पू खेडकर - बाभळेश्वर*
close